टोकियो ऑलिंपिकमध्ये भ्रष्ट्राचार; आयोजक आणि प्रायोजकामधील चार जणांना अटक

लाचखोर प्रकरण; आयोजन समितीतील एक सदस्य व या क्रीडा महोत्सवासाठीचा प्रायोजक असलेल्या कपड्याच्या कंपनीतील तीन व्यक्तींचा समावेश
crime news sport Corruption Tokyo Olympics Four persons organizers and sponsors arrested
crime news sport Corruption Tokyo Olympics Four persons organizers and sponsors arrestedsakal

टोकियो : कोरोनाच्या काळातही जपानने टोकियो ऑलिंपिकसारख्या भव्यदिव्य व प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून दाखवले. त्यामुळे जगभरातून जपानचे कौतुक करण्यात आले; मात्र एका घटनेवरून आता या क्रीडा महोत्सवाला काळा डाग लागला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये लाचखोरी झाल्याचा संशय असून त्या प्रकरणात चार जणांना अटकही करण्यात आली आहे. यामध्ये आयोजन समितीतील एक सदस्य व या क्रीडा महोत्सवासाठीचा प्रायोजक असलेल्या कपड्याच्या कंपनीतील तीन व्यक्तींचा समावेश आहे.

आयोकी होल्डिंग्स कंपनीचे माजी प्रमुख व कंपनीमधील दोन कर्मचाऱ्यांकडून देंतसू या जाहिरात कंपनीचे माजी कार्यकारी अधिकारी हारुयुकी ताकाहाशी यांनी लाच घेतल्याचा संशय आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये जपानच्या खेळाडूंनी या कंपनीचे कपडे परिधान केले होते. याचप्रसंगी इतर देशांतील खेळाडूंनी इतर दिग्गज ब्रॅंडच्या कपड्यांना प्राधान्य दिले होते. जपानच्या खेळाडूंच्या कपड्यांकडे बघितल्यानंतर सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला होता. आयोकी हे तरुणांसाठी बनवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या कंपनीशी जोडलेले आहेत. ॲथलिट परिधान करीत असलेल्या कपड्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही.

खेळ आणि ऑलिंपिकशी संबंधित उत्पादनांच्या प्रायोजकत्वाशी संबंधित ही लाच घेतल्याचा संशय आहे. ऑलिंपिक समितीतील पदाधिकाऱ्यांमध्ये शीर्षस्थानी असलेल्या व्यक्तीने भ्रष्टाचार केल्याची अफवा फार पूर्वीपासून होती; परंतु या प्रकरणातील ही अटक जपानच्या ऑलिंपिक महत्त्वाकांक्षेला धक्का देणारी आहे.

सल्लागार सेवांसाठी रक्कम दिली : ताकाहाशी

हारुयुकी ताकाहाशी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणतीही चूक केलेली नाही. मला फक्त सल्लागार सेवांसाठी शुल्क देण्यात आले. अशा प्रकारचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. दरम्यान, ताकाहाशी यांनी स्थानिक प्रायोजकांद्वारे टोकियो ऑलिंपिकसाठी ३ अब्ज डॉलर्स मिळवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com