Christiano Ronaldo : विश्वचषक सुरू असतानाच रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेडला रामराम; चाहते दुःखात

रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo sakal

Cristiano Ronaldo : फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा दिग्गज स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तात्काळ संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. क्लबने मंगळवारी (२२ नोव्हेंबर) एका निवेदनात ही माहिती दिली. ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गन यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमुळे रोनाल्डोला तीव्र टीकेचा सामना करावा लागला होता. मुलाखतीपासूनच तो यापुढे क्लबसाठी खेळणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मुलाखतीत रोनाल्डोने अनेक मुद्द्यांवर क्लबवर टीका केली. क्लबमधील काही लोक त्याला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मँचेस्टर युनायटेडने आपल्या निवेदनात म्हटले की, 'क्रिस्टियानो रोनाल्डो तात्काळ प्रभावाने परस्पर कराराने मँचेस्टर युनायटेड सोडत आहे. ओल्ड ट्रैफर्डमधील दोन स्पेलमध्ये त्याने दिलेल्या अफाट योगदानाबद्दल क्लब त्याचे आभार मानत आहे.' रोनाल्डोने 346 सामन्यात संघासाठी 145 गोल केले आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Cristiano Ronaldo
FIFA World Cup 2022 : ट्युनिशियाने डेन्मार्कला रोखले

रोनाल्डोला खेळण्याची संधी मिळत नव्हती

या हंगामात रोनाल्डोला क्लबच्या अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला सुरुवातीच्या इलेव्हनमध्येही स्थान मिळाले नव्हते. तो अनेक सामन्यांमध्ये बदली खेळाडू म्हणून खेळला आहे. फुलहॅमविरुद्धच्या संघात रोनाल्डोचेही नाव नव्हते. संघाने तो सामना 2-1 असा जिंकला. प्रसिद्ध पत्रकार पियर्स मॉर्गनला दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि आपला राग काढला. रोनाल्डो 12 वर्षांनंतर 2021 मध्ये क्लबमध्ये सामील झाला होता. 2009 मध्ये त्याने मँचेस्टर युनायटेड सोडले. यानंतर तो स्पेनच्या प्रसिद्ध क्लब रिअल माद्रिदमध्ये गेला. तिथून तो पुन्हा इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com