बेंचवर बसवलेल्या रोनाल्डोने सराव सत्राला मारली दांडी; क्वार्टर फायनलमध्ये नाट्य घडणार? | Cristiano Ronaldo Portugal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo Controversy

Cristiano Ronaldo : बेंचवर बसवलेल्या रोनाल्डोने सराव सत्राला मारली दांडी; क्वार्टर फायनलमध्ये नाट्य घडणार?

Cristiano Ronaldo Controversy : कतारमध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक चर्चेत राहिला. आधी मँचेस्टर प्रकरण आता राऊंड ऑफ 16 मध्ये बेंचवर बसवण्याने तो चर्चेत आला होता. आता तो पुन्हा एकदा संघाच्या सराव सत्राला दांडी मारण्याने चर्चेत आला आहे. स्पॅनिश वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रोनाल्डोने संघातील खेळाडूंसाठी आयोजिक केलेल्या सराव सत्राला दांडी मारली आहे.

हेही वाचा: Ravindra Jadeja & Rivaba : हॅलो MLA... रिवाबाच्या विजयानंतर 'सर' जडेजाचे ट्विट व्हायरल

फिफा वर्ल्डकप सुरू होत होता त्याचवेळी रोनाल्डोचं मँचेस्टर युनायटेड सोबत फाटलं. दरम्यान, रोनाल्डोने साखळी फेरीत पोर्तुगालचे नेतृत्व करतो होता. पोर्तुगालने साखळी फेरी पार करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. त्यांचा सामना स्वित्झर्लंडविरूद्ध झाला. या सामन्यात संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोलाच मॅनेजर फर्नांडो सँटोस यांना बेंचवर बसवले होते. पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा 6 - 1 असा पराभव केला. ख्रिस्तियानो रोनाल्डो या सामन्यात 73 व्या मिनिटाला फेलिक्सच्या जागी मैदानावर उतरला होता.

या सामन्यानंतर रोनाल्डोला बेंचवर बसवण्याची बरीच चर्चा माध्यमांमधून झाली. मँचेस्टरनेही रोनाल्डोला यंदाच्या हंगामात बेंचवर बसवले होते. त्यानंतरच क्लबवर रोनाल्डोने जाहीर टीका केली. आता पोर्तुगालचे मॅनेजर फर्नांडो सँटोस यांनी बेंचवर बसवल्यानंतर रोनाल्डोने सराव सत्राला दांडी मारत जीममध्ये वेळ घालवण्यास पसंती दिली. यावेळी पोर्तुगालमधील माध्यामांना देखील रोनाल्डोच्या सराव सत्राला दांडी मारण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले होते. सर्वांना वाटले होते की रोनाल्डो ज्या खेळाडूंना राऊंड ऑफ 16 सामन्यात बेंचवर बसवलं आहे त्यांच्यासोबत सराव करताना दिसेल.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : युरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती

पोर्तुगालचे मॅनेजर फर्नांडो सँटोस यांनी विरोधी संघाची बलस्थानं आणि कमकूवत दुवा पाहून पोर्तुगालचा संघ निवडण्याचे काम करण्याची मुभा रोनाल्डोला दिली आहे. मात्र रोनाल्डोलाच्या जागी आलेल्या गोन्सालो रामोसने स्वित्झर्लंडविरूद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक केली. यानंतर आता त्याला मोरोक्कोविरूद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात त्याला वगळणे अशक्य आहे.

सँटोस यांना संघातील चपळता वाढवण्यासाठी आपण काही रणनिती आखली असे सांगितले. याचाच अर्थ की रोनाल्डो संघात असातना अशा प्रकारची चपळता राखणे जमत नव्हते.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’