
पणजी : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या २२ ऑक्टोबर रोजी गोव्यात खेळण्याची शक्यता खूपच अंधुक आहे. एएफसी चॅम्पियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात रोनाल्डोचा सौदी अरेबियातील ‘अल नासर क्लब’ व ‘एफसी गोवा’ संघ एकत्रित असले तरी शारीरिक तंदुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ४० वर्षीय स्ट्रायकर बाहेरगावचे (अवे) सामने सहसा खेळत नसल्याची उदाहरणे आहेत.