

International Abacus Competition
esakal
दौंड: दौंड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील रहिवासी संजय कुलकर्णी यांची कन्या शमिष्का ऊर्फ श्रावणी कुलकर्णी हिने थेट जपानमध्ये आपल्या कौशल्याची छाप उमटवत आंतरराष्ट्रीय स्तरावर रौप्य पदकाची कमाई केली आहे. तिच्या या यशामुळे दौंडच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.