प्रेम असावं तर असं! तिच्या मृत्यूनंतर मिलरनं भारताविरुद्धच्या सामन्यात 'अशी' वाहिली श्रद्धांजली

एकट्या डेव्हिड मिलरनेच भारताविरुद्ध छोट्या राजकन्येला श्रद्धांजली वाहिली.
david miller
david miller

David Miller Ind vs Sa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने हा सामना सात विकेटने जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज डेव्हिड मिलरने नाबाद छोटी पण मौल्यवान खेळी खेळली. डेव्हिड मिलर फलंदाजीला आला तेव्हा त्याने डाव्या हाताला काळी पट्टी बांधलेला दिसला. डेव्हिड मिलरशिवाय आफ्रिकेच्या कोणताही फलंदाजाने काळी पट्टी बांधले नव्हती.

david miller
IND vs SA : लोकल बॉय इशान किशनने चाहत्यांना दिला प्रेमाचा 'डबल डोस', पाहा व्हिडिओ

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरचा रॉकस्टार म्हणजेच त्याच्या चाहत्याचा अचानक मृत्यू झाला. त्यांचा चाहता कर्करोगाने ग्रस्त होता. फॅनच्या निधनाने मिलरला खूप दु:ख झाले आहे. यामुळेच भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड मिलरने हाताला काळी पट्टी बांधली. त्याने आजचा डाव त्याच्या छोट्या रॉकस्टारला समर्पित केला. काळ्या पट्टीच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे.

david miller
Video : सिराजने 'जोश'मध्ये आधी स्वतः केली चूक, मग पोहोचला अंपायरशी भांडला

शनिवारी डेव्हिड मिलरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या फॅन्ससोबत काही फोटो शेअर केले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'RIP my dear Princess, love will always be there!' मात्र चाहत्याच्या मृत्यूबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. पण त्याचा रॉकस्टार आता या जगात नाही हे त्याच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सात विकेट गमावत 278 धावा केल्या. एडन मार्करामने 79 आणि रीझा हेंड्रिक्सने 74 धावा केल्या. या दोघांशिवाय डेव्हिड मिलरने नाबाद 35 धावांची उपयुक्त खेळी खेळली. भारताकडून मोहम्मद सिराजने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 45.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com