Video: शतक हुकलेला वॉर्नरचा पॅव्हेलियमध्ये जातानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

David Warner
David Warneresakal

अॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या दिवशी 221 धावांपर्यंत मजल मारली. मार्कस हॅरिस स्वस्तात माघारी गेल्यानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लॅम्बुशग्नेने (Marnus Labuschagne) दुसऱ्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी रचली. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लॅम्बुशेग्ने (Marnus Labuschagne) दोघेही आपले शतक पूर्ण करतील असे वाटत होते. मात्र डेव्हिड वॉर्नर 95 धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याचे शतक अवघ्या 5 धावांनी हुकले. अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यातही डेव्हिड वॉर्नर 94 धावांवर बाद झाला होता.

David Warner
Ashes : स्टोक्सचे दोन धक्के, कांगारुंचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

दरम्यान, शतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झालेला डेव्हिड वॉर्नर ज्यावेळी पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याने एक वेगळीच कृती केली. सध्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. डेव्हिड वॉर्नर ज्यावेळी बाऊंडरी लाईन क्रॉस करुन मैदानात येत होता त्यावेळी त्याने आपल्या हातातील ग्लोज काढले. हे काढलेले ग्लोज त्याने प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये वॉर्नरची सही घेण्यासाठी थांबलेल्या लहान मुलांना दिले. डेव्हिड वॉर्नरच्या या कृतीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे.

David Warner
आधी न्यूझीलंड आता विंडीजनेही पाकिस्तान दौरा अर्ध्यावर सोडला

डेव्हिड वॉर्नर (David Warner) प्रमाणेच मार्नस लॅम्बुशग्ने (Marnus Labuschagne) हा देखील 95 धावांवर अडकला होता. वॉर्नर बाद झाल्यानंतर लॅम्बुशग्नेने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने स्टीव्ह स्मिथच्या साथीने ऑस्ट्रेलियाला (Australia) द्विशतकी मजल मारून दिली. लॅम्बुशग्ने शतकाजवळ पोहचला होता. मात्र तो 95 धावांवर खेळत असताना दिवसाचा खेळ संपला. त्यामुळे त्याला आपल्या शतकासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागली. दुसऱ्या दिवशी मार्नस लॅम्बुशग्नेने आपले शतक पूर्ण केले.

मात्र त्यानंतर तो लगेचच बाद झाला. बेन स्टोक्सने (Ben Stokes) ऑस्ट्रेलियाला पाठोपाठ दोन धक्के दिल्यामुळे डिनरपर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 302 धावा अशी झाली होती. स्मिथने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com