Davis Cup 2024 IND vs PAK : भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, डेव्हिस कपमध्ये 2 - 0 अशी घेतली आघाडी

Davis Cup 2024 : भारताला डेव्हिस कपची पुढची फेरी गाठण्यासाठी फक्त एका विजयाची गरज
Davis Cup 2024
Davis Cup 2024esakal

Davis Cup 2024 IND vs PAK : पाकिस्तानातील इस्लमाबाद येथे सुरू असलेल्या डेव्हिस कप वर्ल्डकप 1 प्ले ऑफ 2024 मध्ये भारताने पाकिस्तानवर 2 - 0 अशी आघाडी घेतली. भारताने मायदेशात खेळणाऱ्या पाकिस्तानचे आव्हान यशस्वीरित्या परतवले. रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी यांनी दबावाच्या वेळी खेळ उंचावला.

सलामीच्या एकेरी सामन्यात एसाम उल हक कुरेशीने झुंजार खेळ करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र आव्हानात्मक परिस्थिती आणि अटीतटीच्या सामन्यात त्याची दमछाक झाली अन् तिसऱ्या सेटमध्ये त्याचा मांडीचा स्नायू दुखावला.

Davis Cup 2024
IND vs ENG : यशस्वीचे द्विशतक, बुमराहचा विकेट्सचा षटकार; दुसऱ्या दिवशीच भारताची सामन्यावर पकड

रामकुमारने हा सामना 6-7 (3), 7-6 (4), 6-0 असा जिंकला. 43 वर्षाच्या कुरेशीला सर्व्ह करताना अडचण येत होती. त्याने सामन्यादरम्यान 10 डबल फॉल्ट केले.

दरम्यान, एन श्रीराम बालाजी हा दुहेरी स्पेशलिस्ट खेळाडूला पाकिस्तानच्या अकील खानने आव्हान दिलं. मात्र भारताच्या तरूण खेळाडूने पाकिस्तानच्या या वरिष्ठ खेळाडूचा 7-5, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याने सामन्यावर पहिल्या सेटपासूनच पकड निर्माण केली होती. त्याने अकीलची सर्व्ह दोन्ही सेटमध्ये एकदा ब्रेक केली. त्याचा वेग, सर्व्ह आणि ड्रॉप शॉटचा देखील खुबीने वापर केला.

Davis Cup 2024
Ind vs Eng 2nd Test : भारताची दुसऱ्या कसोटीवर पकड मजबूत, दिवस अखेर मिळवली 171 धावांची आघाडी

भारत आता वर्ल्डकप 1 मध्ये पुढच्या फेरीत जाण्यासाठी एक विजय दूर आहे. युकी भांब्री आणि साकेत मयनेनी हे रविवारी मुझाम्मीम मुर्तझा आणि बरकत उल्लाह यांच्यासोबत भिडणार आहेत. सामन्यावेळी वातावरण खूप थंड असल्याने खेळाडूंना अडचणी येत आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com