ENG vs BAN: 16 चौकार अन् 5 षटकार... मलानच्या तुफानी शतकाने बाबर - गिलचा विक्रम उद्वस्त

ENG vs BAN: 16 चौकार अन् 5 षटकार... मलानच्या तुफानी शतकाने बाबर - गिलचा विक्रम उद्वस्त

Dawid Malan World Cup 2023 : वर्ल्डकपचा सातवा सामना बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांचे सर्व मनसुबे इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी उद्ध्वस्त केले. एका बाजूने जॉनी बेअरस्टोने 52 धावांची खेळी तर दुसऱ्या बाजूने डेव्हिड मलानने 107 चेंडूत 140 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 5 षटकारही मारले.

ENG vs BAN: 16 चौकार अन् 5 षटकार... मलानच्या तुफानी शतकाने बाबर - गिलचा विक्रम उद्वस्त
शुभमन गिल वर्ल्ड कपमधून जाणार बाहेर? भारत-अफगान सामन्यानंतर निवडकर्त्यांची बैठक, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी

डेव्हिड मालनने या खेळीने अनेक नवे विक्रमही केले. डेव्हिड मलान गेल्या अनेक महिन्यांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आता तो सर्वात कमी डावात 6 एकदिवसीय शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून त्याने अनेक दिग्गज तसेच युवा खेळाडूंचे विक्रम मागे टाकले आहेत.

डेव्हिड मलानने वनडे फॉरमॅटच्या केवळ 23 डावांमध्ये 6 शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या मागे पाकिस्तानचा इमाम उल हक आहे, ज्याने 27 एकदिवसीय डावात 6 शतके झळकावली होती. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी सलामीवीर उपल थरंगा आहे, ज्याने 29 डावांत 6 वनडे शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता.

या यादीत चौथ्या स्थानावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आहे, ज्याने 32 एकदिवसीय डावात 6 शतके झळकावली आहेत. या यादीतील पाचवा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हाशिम आमला आहे, ज्याने 34 एकदिवसीय डावात 6 शतके झळकावली आहेत.

सहाव्या क्रमांकावर भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल आहे, ज्याने वनडे फॉरमॅटच्या 35 डावांमध्ये 6 शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. अशाप्रकारे डेव्हिड मलानने आज बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि भारताचा सर्वोत्तम युवा खेळाडू शुभमन गिल यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com