गुजरात जायंट्सकडून अन्याय? WPL 2023 मधून बाहेर झालेल्या डॉटिनच्या दाव्यांनंतर उडाली खळबळ

Deandra Dottin
Deandra Dottin

WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. गुजरात जायंट्सने वेस्ट इंडिजची स्फोटक अष्टपैलू खेळाडू डिआंद्रे डॉटिनला दुखापतीचे कारण सांगून संघातून वगळले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. डॉटिनने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत गंभीर आरोप केले आहेत. 

डॉटिनने सांगितल्याप्रमाने ती अनफिट नाही किंवा तिला कोणती दुखापत देखील झालेली नाही. तरीही गुजरात जायंट्सने तिला संघातून वगळले. हा वाद आता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. डॉटिनने हा मुद्दा पुन्हा सोशल मीडियावर उपस्थित केला असून नेटकरी गुजरात जायंट्सवर टीका करत आहेत.

गुजरात जायंट्सचे स्पष्टीकरण -

गुजरात जायंट्सने एका निवेदनात म्हटले होते की,  डॉटिन  एक जागतिक दर्जाची क्रिकेटर आहे, ती संघाची उत्कृष्ट खेळाडू आहे. पण आम्हाला निर्धारित वेळेपर्यंत डिआंड्रा डॉटिनची वैद्यकीय मंजुरी मिळालेली नाही. महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी अहवाल देणे अनिवार्य आहे. ती लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे. डॉटिनच्या जागी किम गर्थचा संघात समावेश करण्यात आला. 

Deandra Dottin
IND vs AUS : "रिटायर खेळाडूना फक्त मसाला पाहिजे" वेंकटेश प्रसादवर गौतम गंभीर घसरला

डॉटीन काय म्हणाली ?

मी स्पर्धेत न खेळल्याबद्दल काही संघाकडून आश्चर्यकारक युक्तिवाद करण्यात आल्याने मी खूप निराश आहे. टूर्नामेंटच्या सुरूवातीला फ्रँचायझीने असा दावा केला होता की दुखापतीतून बरी होत आहे. मात्र २० फेब्रुवारीपर्यंत वैद्यकीय मंजुरी पत्र दिले होते. तरीही मला वैद्यकीय स्थितीतून बरी होत असल्यामुळे संघाबाहेर ठेवण्यात आले. 

मला हे स्पष्ट करायचे आहे की मला किरकोळ ओटीपोटात दुखणे आणि फुगणे होते. ज्यासाठी मी डिसेंबर २०२२ मध्ये उपचार केले. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी २०२३ मध्ये तज्ज्ञांनी आणखी २ रेफरल्स दिले. तपासणीनंतर मला तज्ज्ञांनी १३ फेब्रुवारीपर्यंत विश्रांती घेण्यास सांगितले. १४ फेब्रुवारीपासून फिटनेस आणि प्रशिक्षण सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

डॉटिनने सांगितले की, गुजरात जायंट्सने तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला. गुजरात जायंट्सच्या फिजिओथेरपिस्टशी झालेल्या संवादात मी स्पष्ट माहिती दिली होती. मात्र, त्याचा गैरसमज झाला आणि नंतर संघ व्यवस्थापनाच्या सदस्यांना माझ्या पोटदुखीची माहिती देण्यात आली. जे मी सूचित केली नाही. २० फेब्रुवारीपर्यंत माझ्यावर उपचार करणारे शल्यचिकित्सक डॉ इयान लुईस यांनी वैद्यकीय मंजुरीची एक प्रत गुजरात जायंट्सला सुपूर्द केली होती.

Deandra Dottin
WPL 2023 : रोमांचक सामन्यात युपीचा विजय अन् प्लेऑफमध्ये स्थान निश्चित! गुजरातसह आरसीबीही बाहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com