Video : लॉर्ड्सवर दीप्तीने असे काही केले की इंग्लंडचे खेळाडू ढसाढसा रडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepti sharma

Video : लॉर्ड्सवर दीप्तीने असे काही केले की इंग्लंडचे खेळाडू ढसाढसा रडले

India vs England : भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाचा 3-0 असा धुव्वा उडवला. इतकेच नाही तर भारताने इंग्लंडला क्लीन स्वीप करून झूलन गोस्वामीला एक संस्मरणीय भेट दिली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान इंग्लंडच्या शेवटच्या विकेट वरून मोठा गदारोळ झाला.

ही संपूर्ण घटना दीप्ती शर्माने टाकलेल्या इंग्लिश डावाच्या 44 व्या षटकात घडली. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. शार्लोट डीन शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभी असलेली शार्लोट डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत चेंडू फेकण्याऐवजी स्टंप उडवला.

भारतीय खेळाडूंनी धावबाद (मँकाडिंग) साठी अपील केले, त्यानंतर तिसऱ्या पंचाचा सहारा घेण्यात आला. रिप्लेने पुष्टी झाले की डीनने वेळेपूर्वीच क्रीज सोडली. तिसऱ्या पंचाने इंग्लिश फलंदाजाला धावबाद घोषित केले. धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष सुरू केला. दुसरीकडे इंग्लिश खेळाडूच्या डोळ्यात अश्रू आले.

इंग्लंडचे चाहते आणि खेळाडू खूप निराश झाले असतील, तरी आयसीसीच्या नियमानुसार, मँकाडिंग आता सामान्य धावबाद मानला जाणार आहे. आयसीसीने यावर्षी मॅनकाडिंगला कायदा 41.16 (अयोग्य) वरून रन-आऊट नियम (38) मध्ये हलवले आहे. हा नवा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.