esakal | ऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेता जोकोविच पराभूत 
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic

ऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेता जोकोविच पराभूत 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न : गतविजेता नोव्हाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टॉमिनने जोकोविचचा पराभव केला. 

जोकोविचने आतापर्यंत या स्पर्धेत सहा वेळा विजेतेपद मिळविले आहे. डेनिस इस्टॉमिन सध्या जागतिक टेनिस क्रमवारीत 117 व्या क्रमांकावर आहे, तर जोकोविच दुसऱ्या स्थानी आहे. हा सामना जवळपास पाच तास चालला होता. यात जोकोविचचा 7-6 (10/8), 5-7, 2-6, 7-6 (7/5), 6-4 असा पराभव झाला. 

जागतिक टेनिस क्रमवारीत 100 व्या स्थानापेक्षा खालच्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूकडून पराभव होण्याची ही जोकोविचची गेल्या सात वर्षांतील दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये 145 व्या क्रमांकावर असलेल्या ज्युआन डेल पोट्रोकडून जोकोविचचा पराभव झाला होता. 

गेल्या सहा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धांपैकी पाच वेळा अँडी मरेला जोकोविचकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता गतविजेता जोकोविचच स्पर्धेबाहेर पडल्याने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत दुसऱ्याच फेरीतून बाहेर पडायची ही जोकोविचची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2008 मधील विंबल्डनमध्ये दुसऱ्या फेरीत मराट सफीनने जोकोविचवर मात केली होती. 

loading image