अजिंक्य रहाणेसाठी 'हा' आयपीएलचा संघ लावतोय भक्कम फिल्डिंग 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलशी नाते घट्ट असणारा अजिंक्‍य रहाणे पुढील मोसमात मात्र त्यांच्याकडून खेळू शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्यासाठी राजस्थान रॉयल प्रॅंचाईजीकडे भक्कम फिल्डिंग लावली आहे.

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलशी नाते घट्ट असणारा अजिंक्‍य रहाणे पुढील मोसमात मात्र त्यांच्याकडून खेळू शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्यासाठी राजस्थान रॉयल प्रॅंचाईजीकडे भक्कम फिल्डिंग लावली आहे.

या दोन्ही फ्रॅंचाईजी दरम्यान सकारात्मक चर्चा झाल्यास रहाणे नव्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळू शकेल. रहाणे यापूर्वी 2008, 2009 मध्ये मुंबईकडून खेळला आहे. त्याने 2010 स्पर्धेपासून त्याने स्वतःला दूर ठेवले होते. त्यानंतर 2011 मध्ये तो राजस्थानकडून खेळला. राजस्थान फ्रॅंचाईजीवर बंदी आली तेव्हा तो पुण्याकडून खेळला.

बंदी उठल्यावर तो पुन्हा राजस्थानकडूनच खेळला होता. मात्र, मध्यातच त्याच्याकडून नेतृत्व काढून घेण्यात आले होते. आता नव्या मोसमात तो कुठल्या संघाकडून खेळेल हे आता दोन मालकांच्या चर्चेवरच अवलंबून असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Capitals Keen To Rope In Ajinkya Rahane From Rajasthan Royals