Delhi Capitals vs Lucknow Super Giants : खराब क्षेत्ररक्षणामुळे दिल्लीचा पराभव ; पाँटिंग

दिल्लीच्या खराब क्षेत्ररक्षणावर टीका करताना संघाचे मुख्य प्रशिक्षक पाँटिंग म्हणाले
IPL 2023
IPL 2023 sakal

लखनौ : ‘कॅचेस विन मॅचेस’ अशी इंग्लिशमध्ये क्रिकेट खेळाबाबतीत म्हण आहे. तुमच्या संघाची सामने जिंकायची शक्यता तेव्हाच वाढते जेव्हा तुमच्या संघातील खेळाडू चांगले झेल घेतात किंवा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात.

असाच काहीसा प्रकार शनिवारी (ता. १) झालेल्या सामन्यात घडला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् यांच्यातील सामन्यात लखनौच्या संघाने विजय संपादन केला. या पराभवामुळे दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग व्यथित झाले असून, आमच्या संघातील खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळे पराभव झाला असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले आहे.

दिल्लीचा जलदगती गोलंदाज खलील अहमद याने लखनौच्या काईल मेयर्सचा सोपा झेल सोडला. त्यानंतर मेयर्सने तुफानी खेळी करत केवळ ३८ चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या. त्यामुळे लखनौच्या संघाला धावफलकावर चांगली धावसंख्या उभी करता आली.

दिल्लीच्या खराब क्षेत्ररक्षणावर टीका करताना संघाचे मुख्य प्रशिक्षक पाँटिंग म्हणाले, ‘‘आम्ही जेवढ्या धावा द्यायला हव्या होत्या त्यापेक्षा जास्त धावा आमच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण करताना लखनौच्या संघाला दिल्या. पहिल्या चार षटकांनंतर आमचे क्षेत्ररक्षण खराब पातळीचे झाले. खेळाडूंकडून सोपे झेल सोडले गेले,

IPL 2023
Solapur : जिल्ह्यातील १००० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर; ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

तर काही जणांकडून सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षणामुळे धावा दिल्या गेल्या. याच सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षणापैकी एक म्हणजे खलील अहमदने मेयर्सचा सोडलेला सोपा झेल. त्याचा झेल सोडल्यानंतर मेयर्सने तुफानी खेळी करत आमच्या संघाला मागे ढकलले. पुढच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास आम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करावेच लागेल. दिल्लीचा पुढचा सामना घरच्या मैदानावर ४ एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.

IPL 2023
Kolhapur : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लुटणाऱ्यांना धडा शिकवूया

गोलंदाजांवर निशाणा

लखनौमधील मैदानावरील खेळपट्टी बघता येथे १८० पेक्षा जास्त धावा होतील असे वाटले नव्हते. मात्र दिल्लीच्या संघातील गोलंदाजांनी हवी तशी गोलंदाजी केली नाही. गोलंदाजी अचूक नसल्याने लखनौने त्यांच्या डावात एकूण १६ षटकार मारले. आमची गोलंदाजी चुकीची झाल्यानेच त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात षटकार मारले. योग्य गोलंदाजाला योग्य वेळी संधी दिल्यास संघ जिंकेल, असा विश्‍वास पाँटिंग यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com