ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी धोनी माझ्या संघात नकोच : सुनील गावसकर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना आगामी ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी त्यांच्या संघात महेंद्रसिंह धोनीला स्थान दिलेले नाही. त्यांनी भारतीय संघाला आणि निवड समितीला धोनीच्या पलिकडे जाऊन विचार करण्याचा सल्ला दिला आहे. धोनीच्याऐवजी गावसकरांनी रिषभ पंतला संघात स्थान दिले आहे. 

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना आगामी ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी त्यांच्या संघात महेंद्रसिंह धोनीला स्थान दिलेले नाही. त्यांनी भारतीय संघाला आणि निवड समितीला धोनीच्या पलिकडे जाऊन विचार करण्याचा सल्ला दिला आहे. धोनीच्याऐवजी गावसकरांनी रिषभ पंतला संघात स्थान दिले आहे. 

BCCI, राहुल द्रविडसमोर रवी शास्त्रींची लायकी तरी काय?

धोनीला बांगलादेशच्या दौऱ्यासाठी संघात स्थान द्यावे की नाही असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्टपणे नाही असे उत्तर दिले. ''यष्टीरक्षणासाठी आता आपण धोनीच्या पलिकडे जाऊन विचार कारयला हवा. किमान माझ्यातरी संघात मी धोनीला स्थान देणार नाही. ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी माझ्या संघात मी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतलाच स्थान देईल,'' अशा शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

पुढील मालिकांमध्ये पंत सातत्याने अपयशी ठरला तर त्याला कोणाचा पर्याय असेल याचाही त्यांनी विचार करुन ठेवला आहे. ते म्हणाले, ''जर येत्या काळात पंतने चांगली कामगिरी नाही केली तर दुसरा पर्यंय म्हणून मी संजू सॅमसनला संधी देईल.''

टीम इंडियाकडून फेल ठरला आता रिषभ पंत खेळणार या संघाकडून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhoni not in my team says Sunil gavaskar for T20 World Cup 2020