Dilip Tirkey : माजी हॉकीपटू दिलीप तिर्की हॉकी इंडियाचा नवा अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Tirkey elected as Hockey India's new president

Dilip Tirkey : माजी हॉकीपटू दिलीप तिर्की हॉकी इंडियाचा नवा अध्यक्ष

नवी दिल्ली : भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याची हॉकी इंडियाचा नवा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भारताचा माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू दिलीप तिर्कीची आज हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तिर्कीची ही निवड बिनविरोध झाली आहे हे विशेष. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदसाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी आपले नामांकन मागे घेतल्यानंतर दिलीप तिर्कीचा हॉकी इंडियाचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. (Dilip Tirkey elected as Hockey India's new president)

हेही वाचा: Jasprit Bumrah : बुमराह परतणार; भुवी, पटेल की यादव कोणाचा पत्ता कट होणार?

दिलीप तिर्कीच्या नावावर भारताकडून सर्वाधिक सामन्यात प्रतिनिधित्व केल्याचे रेकॉर्ड आहे. त्याने आपल्या 15 वर्षाच्या दीर्घ कारकिर्दित भारताकडून 412 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, दिलीप तिर्कीने हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर 'भारतीय हॉकीला नव्या उंचीवर नेण्यासाठी काम करणार.' असे ट्विट केले.

हेही वाचा: IND vs AUS 2nd T2OI : भारत - ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात पाऊस खेळ बघडवू शकतो?

तिर्कीची हॉकी इंडियाच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (FIH) देखील त्याचे अभिनंद केले. 'आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन, हॉकी इंडियाची निवडणूक प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडणाऱ्या प्रशासन समितीतील सर्व सदस्यांचे अभिनंदन करते.' अशा आशयाचे पत्र त्यांनी पाठवले.

हॉकी इंडियाचे नवे पदाधिकारी

दिलीप तिर्की (अध्यक्ष), असिमा अली ( महिला उपाध्यक्ष), एस.व्ही.एस सुब्रमण्य (पुरूष उपाध्यक्ष), आरती सिंग (सह सचिव महिला), सुनिल मलिक (सह सचिव पुरूष)

हॉकी इंडिया बोर्ड सदस्य :

अरूण कुमार सारस्वत (हॉकी राजस्थान), असरिता लाक्रा (हॉकी झारखंड), गुरप्रीत कौर (हॉकी दिल्ली), व्ही. सुनिल कुमार (केरळ हॉकी), तपन कुमार दास (आसाम हॉकी)

Web Title: Dilip Tirkey Elected As Hockey Indias New President

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hockey