INDvsSA : ..पण एबी डिव्हिलर्स, हशिम आमला यांची उणीव कोण भरणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

"सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पुर्नबांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. एबी डिव्हिलियर्स, हाशिम अमला यांची उणीव ही त्यांना प्रकर्षाने जाणवेल. याउलट, भारतीय संघाला पाहुण्या संघाच्या या त्रुटी बरोबरच घरच्या मैदानाचा फायदा होईल,"

पिंपरी-चिंचवड : "सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पुर्नबांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. एबी डिव्हिलियर्स, हाशिम अमला यांची उणीव ही त्यांना प्रकर्षाने जाणवेल. याउलट, भारतीय संघाला पाहुण्या संघाच्या या त्रुटी बरोबरच घरच्या मैदानाचा फायदा होईल," असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. 

स्मिथ समोर मी हात टेकले, तो बादच होत नाही राव : आर्चर 

थेरगाव येथील पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथे वेंगसरकर हे आले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. वेंगसरकर म्हणाले," एबी डिव्हिलियर्स, हाशिम अमला यांच्या गैरहजेरीत त्यांचे पर्यायी खेळाडू कसे खेळतात हे बघणे आैत्सुक्याचे ठरेल. संघातील नवोदित खेळाडूंमुळे त्यांच्या खेळात थोडी फार आक्रमकता पाहण्यास मिळू शकेल. त्यांच्या संघातील काही नवोदित वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाज देखील चांगले आहेत. त्यांची फलंदाजी अनुभवी नाही. नवोदित खेळाडूंना स्वतः ला सिध्द करण्याची संधी मिळेल. "

भारतीय संघातील बदलाबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले, "रोहित शर्मा बरोबर मयंक अगरवाल यांची जोडी सलामीला येण्याची अपेक्षा आहे. ऋषभ पंतकडून कामगिरीत  सुधारणा झाली नाही. त्याच्या कडून खूप अपेक्षा आहेत. संघातील निवडीच्या रुपाने  सातत्यपूर्ण कामगिरीची शुभमन गिल याला परतफेड मिळाली आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Vengsarkar says South Africa will face the absence of AB de Villiers and Hashim Amla gainst India