

Dilip Vengsarkar
sakal
मुंबई : अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असा मोलाचा सल्ला भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी युवा खेळाडूंना दिला. निमित्त होते नवीन पनवेल येथील मैदानावर पार पडलेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.