
Roll no.1 म्हणत धुराच्या लोटातून दिनेश कार्तिकची एन्ट्री!
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना खेळण्यासाठी राजकोटमध्ये दाखल झाला आहे. आज हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाला मालिकेत टिकायचे असेल तर चौथा टी२० सामना जिंकावा लागेल. दरम्यान, सध्या फॉर्मात असणाऱ्या दिनेश कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
हेही वाचा: IND vs SA T20: चौथ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे वाढले टेन्शन, पण...
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कार्तिक धुराच्या मधूनच एंट्री घेत आहे. हा व्हिडिओ विमानातील असून यामध्ये भारतीय संघाचे इतर खेळाडूही दिसत आहेत. कार्तिकची एन्ट्री पाहून सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कार्तिकने खास कॅप्शनदेखील दिली आहे. ‘तोंडी परिक्षेच्या रूममधून बाहेर येत असलेला रोल नंबर एक’ असे कार्तिकने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते कार्तिकची तुलना शाहरुख खानसोबत करत आहेत. किंग खानने त्याच्या ‘रईस’ चित्रपटात अशीच एन्ट्री केली होती.
हेही वाचा: टीमसोबत न दिसलेला कर्णधार रोहित 'या' दिवशी होणार इंग्लंडला रवाना
कार्तिक तीन वर्षानंतर टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या तीन सामन्यात कार्तिकने एक रन, दुसऱ्या सामन्यात नाबाद ३० तर तिसऱ्या सामन्यात ८ चेंडूवर ६ धावा केल्या आहेत.
त्याने गेल्या आयपीएल हंगामात १८३.३३ च्या स्ट्राइक रेटने आणि ५५ च्या सरासरीने ३३० धावा केल्या. कार्तिक १६ डावात फलंदाजीला आला आणि गोलंदाज त्याला फक्त ६ वेळा बाद करू शकला. त्याला आयर्लंड दौऱ्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे.
Web Title: Dinesh Karthik Reminds Shahrukh Khan Entered In Plane With Fog
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..