
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सीलने आज (दि. 27) टीव्ही आणि डिजीटल प्रसारण हक्क लिलाव डिस्ने स्टारने जिंकला असल्याचे जाहीर केले. डिस्ने स्टारला हे हक्क पुढचे चार वर्ष मिळणार आहेत. म्हणजे आता आयसीसीच्या 2027 पर्यंतच्या सर्व स्पर्धा आता डिस्ने स्टारवरूनच प्रसारित होणार आहेत. यात पुरूष आणि महिला क्रिकेट स्पर्धांचे प्रसाराण हक्क समाविष्ट आहेत. (Disney Star won the ICC TV and digital rights for the next four Years)
डिस्ने स्टारने एकाच फेरीत आयसीसीचे प्रसारण हक्क आपल्या नावावर केले. यामुळे आयसीसीची गेल्या लिलाव प्रक्रियेच्या तुलनेत यंदाच्या लिलाव प्रक्रियेतून चांगली कमाई झाली. आयसीसीने आपल्या पुढच्या सायकलसाठी जून 2022 पासून प्रसारण हक्क लिलाव प्रक्रिया सुरू केली होती.
दरम्यान, आयसीसीचे चेअरमन ग्रेक बार्क्ले या प्रक्रियेबाबत म्हणाले, 'आम्हाला डिस्ने स्टारशी पुन्हा एकदा भागीदारी करताना आनंद होत आहे. पुढची चार वर्षे आमच्या सदस्य आणि पाठिराख्यांसाठी चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतील. ते आमची ध्येय आणि विकासात मोठे भागीदार ठरतील. क्रिकेटच्या भवितव्यात ते महत्वाची भुमिका बजावतील. ते यापूर्वीपेक्षाही जास्त फॅन्सना आमच्याकडे खेचतील अशी आशा आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.