
नवी दिल्ली : बुद्धिबळ क्षेत्रात प्रगती करीत असलेल्या भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने लंडन येथे सुरू असलेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स सांघित अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या होऊ यिफान हिचा धक्कादायक पराभव केला.