समालोचकांचा असाही क्रिकेटचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समालोचकांचा असाही क्रिकेटचा आनंद

समालोचकांचा असाही क्रिकेटचा आनंद

क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत. खेळाडूंइतकेच त्यांना आपल्या भूमिकेसाठी झटपट तयार व्हावे लागते. हा सामना संपला की दुसरा, दुसरा संपला  की तिसरा असा त्यांचा प्रवास खेळाडूंबरोबर सुरूच असतो. पण, या कालावधीतही त्यांना क्रिकेट स्वस्थ बसू देत नाही.

क्रिकेटवर चर्चा करत असतानाच मैदानावर संधी मिळाली की क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात. मग, ते लुटुपुटूचे असले, तरी चालेल. भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणार की नाही याचे अंदाज बांधत असताना सकाळी माईक हातात घेण्यापूर्वी हे क्रिकटपटू आपल्या समालोचनाच्या हद्दीत एकत्र आले आणि त्यांनी मजा म्हणून क्रिकेटचा आनंद लुटला. यामध्ये व्ही.व्हीएस. लक्ष्मण, निखिल चोप्रा, गौतम गंभीर, आर. पी. सिंग, आकाश चोप्रा, इरफान पठाण, ग्रॅमी स्मिथ यांचा सहभाग होता. सर्व खेळाडूने एका हाताने फलंदाजी करण्याचे ठरले होते. त्या प्रमाणे सगळ्यांनी खेळ केला. विशेष म्हणजे प्रसारण करणाऱ्या स्टारकडून निवेदकांची भूमिका बजावणारे याचे समालोचनही करत होते.

एका  जागी बसून खेळाचे समालोचन करताना येणारा एक प्रकारचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी असा विरंगुळा त्यांना  फ्रेश करून जातो. सामना संपल्यावर दिवसभराच्या सामन्याचे आवलोकन करायचे असते. तसेच त्यांना बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. त्यामुळे सामन्यापूर्वी हे खेळाडू असा विरंगुळा शोधत असतात.

Web Title: Dnyanesh Bhure Articles Commentators Enjoy Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..