esakal | VIDEO : सोशल मीडियावर रंगलीये श्वानाच्या खतरनाक फिल्डिंगची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO : सोशल मीडियावर रंगलीये श्वानाच्या खतरनाक फिल्डिंगची चर्चा

VIDEO : सोशल मीडियावर रंगलीये श्वानाच्या खतरनाक फिल्डिंगची चर्चा

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा नागरिक असलेल्या जारवोने वारंवार मैदानात येऊन खेळात अडथळा आणल्याचे पाहायला मिळाले होते. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र महिला क्रिकेटच्या मैदानात एका मजेशीर घटना घडल्याचे पाहायला मिळाले. ऑल आयरलंड टी20 सामन्यात एक श्वान मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

ब्रेडी क्रिकेट क्‍लबच्या मैदानात ब्रेडी आणि सीएसएनआय महिला संघामध्ये टी-20 सामना सुरु होता. सामन्यादरम्यान एक श्वान मैदानात घुसले. एवढेच नाही तर चेंडू तोंडात पकडून या श्वानाने जणून धाव घेत असलेल्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्नच केल्यासारखे चित्र पाहायला मिळाले. सामन्यातील 9 व्या षटकात हा सर्व प्रकार घडला.

हेही वाचा: पाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, विराट विरोधात 'डर्टी गेम'

9 व्या षटकात एबी लेकीने स्केअर लेगच्या दिशेने चेंडू फटकावला. फटका मारल्यानंतर तिने एकेरी धाव घेण्यासाठी क्रिज सोडले आणि धाव पूर्णही केली. फिल्डरने विकेट किपर रिचेलकडे टाकलेल्या चेंडूच्या दिशेन धाव घेत श्वानाने मैदानात एन्ट्री मारली. ओव्हर थ्रोमुळे तो चेंडू श्वानाला मिळाला. मैदानातील फिल्डर आधी श्वान त्या चेंडूपर्यंत पोहचले आणि चेंडू तोंडात घेऊन पळायला सुरुवात केली. श्वान पुढे पळत होते आणि त्याच्यामागून फिल्डिंग करणाऱ्या महिला खेळाडूंची पळापळ सुरु झाली. नॉन स्ट्राइकला असलेल्या फलदाजाने अखेर श्वानाला पकडले. त्यानंतर एक व्यक्ती या श्वानाला बाहेर घेऊन जाताना पाहायला मिळाले.

loading image
go to top