
Video : दुलीप ट्रॉफी पश्चिम विभागच्या नावावर; सामनावीरालाच कर्णधार रहाणेने काढले मैदानाबाहेर
Duleep Trophy 2022 Ajinkya Rahane Yashasvi Jaiswal : देशांतर्गत दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग चॅम्पियन ठरला आहे. अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 धावांनी पराभव केला. या पाच दिवसीय सामन्यातील पहिल्या दोन दिवसांत पश्चिम विभाग पिछाडीवर होता, मात्र शेवटच्या तीन दिवसांत या संघाने दमदार कामगिरी करत करंडक पटकावला. यशस्वी जैस्वालला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्याचा शेवटचा दिवस वादाने भरलेला होता. दक्षिण विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या संघाची युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढले. यशस्वी जैस्वालच्या त्या कृत्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेला टोकाचं पाऊल उचलाव लागलं. यशस्वी वारंवार दक्षिण विभागाच्या फलंदाजांची विशेषतः रवी तेजाची स्लेजिंग करत होता. पंचांनी यशस्वीला दोन-तीन वेळा इशाराही दिला. मात्र डावाच्या 57 व्या षटकात यशस्वीने पुन्हा एकदा तेच केले तेव्हा पंचांनी आवरले नाही. कर्णधार रहाणेशी त्याने बराच वेळ संभाषण केले, त्यानंतर यशस्वीला मैदान सोडावे लागले.
दुसऱ्या डावात पश्चिम विभागाने सावध सुरुवात केली. यशस्वी जैस्वालसह प्रियांक पांचालने पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. यानंतर अजिंक्य रहाणे (15), श्रेयस अय्यर (71) आणि सर्फराज खान (127) यांनी यशस्वीला चांगली साथ दिली. यशस्वीने 265 धावांची खेळी खेळली. अशा प्रकारे पश्चिम विभागाने त्यांचा दुसरा डाव 584/4 धावांवर घोषित केला.
529 धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण विभागाची दमदार सुरुवात झाली. सलामीवीर रोहन कुनुमल (93) आणि रवी तेजा (53) यांच्याशिवाय एकही फलंदाज विकेटवर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ अवघ्या 234 धावांत ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात शम्स मुलानीने 4 आणि जयदेव उनाडकटने 2 बळी घेतले.