World Athletics Championship : ट्रिपल जंप फायनलमध्ये भारताचा पॉल नवव्या स्थानावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eldhose Paul World Athletics Championship

World Athletics Championship : ट्रिपल जंप फायनलमध्ये भारताचा पॉल नवव्या स्थानावर

ऑरेगॉन : जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (World Athletics Championship) ट्रिपल जंप (Triple Jump) प्रकारात भारताचा एल्डहोसे पॉल (Eldhose Paul) अंतिम फेरीत 9 व्या स्थानावर राहिला. त्याला फायनलच्या टॉप 8 मध्ये स्थान मिळवता आले नाही. त्याने 16.79 मीटर लांब उडी मारली. पॉल हा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ट्रिपल जंप प्रकारात फायनलमध्ये पोहचणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.

हेही वाचा: Hardik Pandya पुढच्या वर्षी निवृत्ती घेणार!... धक्कादायक दावा

एल्डहोसे पॉल पहिल्या दोन प्रयत्नात 16.37 मीटर उडी मारत पदकाच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर त्याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारत 16.79 मीटर उडी मारली. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने 13.86 मीटर उडी मारली. पॉल पहिल्या तीन उडींच्या आधारे पहिल्या आठ जणांच्या यादीत येण्यापासून थोडक्यात चुकला. तो 19.79 मीटर उडीच्या आधारे यादीत नवव्या स्थानावर राहिला.

पॉल हा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंप प्रकारात फायनलमध्ये पोहचणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ही 16.99 मीटर इतकी आहे.

Web Title: Eldhose Paul Finish In 9th Triple Jump World Athletics Championship Final Event

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Athletesindain athelete