तेजस्विनीला मागे टाकत एलिझाबेथ अव्वल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

केरळच्या एलिझाबेथ सुसान कोशी हिने सरदार सज्जनसिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने तेजस्वीनी सावंतला मागे टाकत ही कामगिरी केली.

मुंबई : केरळच्या एलिझाबेथ सुसान कोशी हिने सरदार सज्जनसिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम फेरीत 460.1 गुणांची कमाई करताना तेजस्विनी सावंतला मागे टाकले.

तेजस्विनी 455.6 गुणांसह दुसरी आली. गुजरातच्या हेमाने ब्रॉंझपदक जिंकले. प्राथमिक फेरीत एलिझाबेथ सहावी होती. अंतिम फेरीत पहिल्या दहा शॉटस्‌नंतर ती चौथी होती. मात्र प्रोनमधील दुसऱ्या शॉटनंतर घेतलेली आघाडी तिने अखेरपर्यंत कायम राखली.

अन्नुराज सिंग - दीपक शर्माने 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक जिंकताना श्वेता सिंग - अमनप्रीत सिंगला 17-5 असे हरवले. गुरप्रीत सिंगने सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेपाठोपाठ 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल प्रकारातही बाजी मारली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elizabeth beat tejaswini in three position shooting final