Skating : स्केटिंग स्पर्धेत युवान आणि सप्तशीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सप्तशी ही वयाच्या पाचव्या वर्षीपासून तर युवान हा वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून करतो स्केटिंग..
skating winners saptashati sawant Yuvaan pashte
skating winners saptashati sawant Yuvaan pashteesakal

मुंबई: राष्ट्रीय एंडोरन्स राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा २०२३-२४ ही नुकतीच खोपोलीमध्ये पार पडली.

यामध्ये महाराष्ट्रातील युवान पाष्टे (वय ५ वर्ष) आणि सप्तशी सावंत (वय ७ वर्ष) यांनी स्केटिंगमध्ये तीन ब्रॉन्झ मेडल जिंकत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली आहे.

अनुक्रमे पाच वर्षाखालील आणि सात वर्षाखालील वयोगटात या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. (Skating Saptshi Sawant Yuvaan Pashte)

या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी सात राज्यातील सर्व गटांतून एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रासह, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश , तेलंगणा या राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते.

मुंबईतील स्केटलाईट अकादमीचे संस्थापक आणि प्रशिक्षक संदीप माने आणि विनोद माने यांच्याकडे ही दोघेही स्केटिंगचे शिक्षण घेतात. या स्पर्धेतून भारतातून २०० खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून एकूण ६०० खेळाडूंमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

मे २०२४ मध्ये श्रीलंका येथे ही स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत युएई, इजिप्त, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, केनिया, श्रीलंका यांसह अनेक देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत.

सप्तशी ही वयाच्या पाचव्या वर्षीपासून तर युवान हा वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून स्केटिंग करतो. गोपीनाथ मुंडे आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकवर हे सराव करतात. सप्तशीने सलग आठ तास स्केटिंगचा विक्रम देखील केला आहे.

तसेच टाइम नॅशनल आणि आशिया पॅसिफिकमध्ये तिच्या नावावर विक्रमाची नोंद आहे. याशिवाय शाळेचा अभ्यास सांभाळून स्केटिंगसोबतच कथ्थक, कराटे, फुटबॉल याही गोष्टी आवडीने करते. तर युवान देखील चित्रकला विषयात पारंगत आहे.

त्याने याआधीही स्केटिंग या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक देखील मिळवले आहे. या दोघांनाही त्यांच्या आई आणि वडिलांचे प्रोत्साहन मिळत असल्याने ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत. याशिवाय यांना स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.

----------------

skating winners saptashati sawant Yuvaan pashte
Schoolympics 2023 Skating : स्कूलिंपिकच्या स्केटिंग स्पर्धेत मुलांमध्ये स्वनिक, ओजस, पलाश यांना सुवर्णपदके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com