
ENG Vs AUS ODI WC 2023 : ऑस्ट्रेलियन फलंदाजांची २८६ धावा करताना दमछाक झाली असली तरी ही धावसंख्या त्यांनी पराभाच्या खाईत गटांगळ्या खात असलेल्या इंग्लंडचा पराभव करून निर्णायक ठरवली. ३३ धावांनी विजय मिळवत विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपली उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली.
गेल्या काही सामन्यात फलंदाजीत शरणागती स्वीकारणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी आज प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण ठराविक प्रयत्नानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच न त्यांची अवस्था झाली. डेव्हिड मलान, वेन स्टोक्स आणि मोईन अली यांनी आशा दाखवल्या, परंतु ऑस्ट्रेलियन अ गोलंदाजांनी त्यांना विजयापासून दूरच ठेवले.
या पराभवासह इंग्लंड संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला स्थान मिळवणे कठीण आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याचा दावा मजबूत केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे. हा संघ उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा संघ बनण्याच्या अगदी जवळ आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मजेशीर लढत होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकांत सर्व गडी गमावून 286 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने 71 आणि कॅमेरून ग्रीनने 47 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 44 धावांची खेळी केली. शेवटी अॅडम झाम्पाने 29 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने चार विकेट घेतल्या. मार्क वूड आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. डेव्हिड विली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
287 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 48.1 षटकांत केवळ 253 धावाच करू शकला आणि सामना गमावला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 64 धावा केल्या. डेव्हिड मलानने 50 आणि मोईन अलीने 42 धावांचे योगदान दिले. अखेरीस ख्रिस वोक्सने 32 धावा केल्या आणि आदिल रशीदने 20 धावा करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने तीन विकेट घेतल्या. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.