Virat Kohli : शतकवीर दीपक हुड्डा सोडून फ्लॉप विराट कोहलीला संधी; अन् फक्त एक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepak hooda replacement virat kohli flops in 2nd t20 match

Eng Vs Ind: शतकवीर दीपक हुड्डा सोडून फ्लॉप विराट कोहलीला संधी; अन् फक्त एक...

Eng vs Ind T20 भारताने दुसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. यासह भारताने ही मालिका 2-0ने जिंकली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 170 धावा फलकावर लावल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाच्या बड्या स्टार्सनी पुनरागमन केले होते. माजी कर्णधार विराट कोहलीचा प्लेईंग-11 मध्ये सामील करण्यात आला होता.

विराट कोहलीने 3 नंबर वर फलंदाजी केली आणि फक्त 2 चेंडू खेळत 1 धावा काढून बाद झाला. कोहलीचा फ्लॉप शो बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. विराट कोहली फ्लॉप झाल्यावर चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे.(deepak hooda replacement virat kohli flops in 2nd t20 match)

हेही वाचा: MS Dhoni: एमएस धोनीने इंग्लंडमध्ये घेतली भारतीय खेळाडूंची भेट

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत दीपक हुड्डा गेल्या काही टी-20 मध्ये याच 3 नंबर वर खेळत होता. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडाने आयर्लंडविरुद्ध शतकासह सातत्यपूर्ण कामगिरी केली. हुडाने गेल्या तीन डावात 184 धावा केल्या आहेत.

दीपक हुडाच्या शेवटच्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील धावा

  • विरुद्ध इंग्लंड- 33

  • विरुद्ध आयर्लंड- 104

  • विरुद्ध आयर्लंड - 47*

दीपक हुड्डा फॉर्ममध्ये असतानाही त्याला प्लेइंग-11 मधून वगळल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, स्टार खेळाडू संघात परतल्यावर कोण बाहेर पडेल, अशी शंका आधीच होती. कारण टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतालाही आपल्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माचा विजयी रथ सुसाट; इंग्लंडला लोळवले

टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा - ऋषभ पंतने जबरदस्त सुरुवात दिली. मात्र दोघेही बाद होताच भारताचा डाव डगमगला. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांना कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने 170 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 121 धावांवर गारद झाली. भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Web Title: Eng Vs Ind T20 Deepak Hooda Replacement Virat Kohli Flops In 2nd T20 Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top