esakal | IND vs ENG : ओव्हलवर अश्विन 'अलोन'; फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Ravichandran Ashwin

IND vs ENG : ओव्हलवर अश्विन 'अलोन'; फोटो व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविचंद्रन अश्विनला डावलून रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या 20 सदस्यीय संघात अश्विनचाही सामावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर त्याला एकाही सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. त्याला संघाबाहेर ठेवण्यावरून अनेक चर्चाही रंगत आहेत. त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आलेल्या रविंद्र जडेजालाही नावाला साजेसा खेळ करण्यात आलेला नाही. चौथ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी भारतीय संघाला पुन्हा एकदा अश्विनची आठवण निश्चितच येईल, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. दरम्यान सोशल मीडियावर अश्विनचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

ओव्हलच्या स्टेडियममध्ये अश्विन एकटाच उदास बसल्याचे या फोटोत दिसते. यावर प्रतिक्रियांची अक्षरश: बरसात होताना दिसते आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खेळून अश्विनने सरावही केला होता. सरेकडून खेळताना त्याने ओव्हलच्या मैदानातच 27 धावा खर्च करुन 6 विकेटही घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. ओव्हलचे मैदानात हे फिरकीसाठी अनुकूल आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या यंदाच्या हंगामात 899.5 षटके ही फिरकीपटूंनी टाकली आहेत. यात फिरकीपटूंनी 59 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे या मैदानात अश्विनला संधी मिळेल, असे बोलले जात होते.

मागील काही कसोटी सामन्यात लक्षवेधी कामगिरी करुनही अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता मँचेस्टर कसोटी सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यात आणखी भर पडली असून अश्विनचा फोटोची चर्चा रंगताना दिसते. रविंद्र जडेजाच्या कामगिरीचा दाखला देत अश्विनसाठी नेटकरी बॅटिंग करताना दिसते.

अश्विनची कामगिरी

अनिल कुंबळे (619) आणि हरभजन सिंग (417) या दिग्गजानंतर कसोटीमध्ये भारताकून सर्वाधिक विकेट्स घेणारा अश्विन हा तिसरा फिरकीपटू आहे. 79 कसोटी सामन्यात अश्विनच्या खात्यात 413 विकेट्सची नोंद आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विनने भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत तीन कसोटी सामन्यात 12 विकेट तर इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानावर मिळून 32 विकेट घेतल्या होत्या.

loading image
go to top