दिग्गज खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर! दोन वर्षांच्या लेकीचं आजाराने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

england and surrey-cricketer-matt-dunn-two-years-old-daughter-florence-passes-away

दिग्गज खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर! दोन वर्षांच्या लेकीचं आजाराने निधन

क्रिकेट जगतातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लिश क्रिकेटर मॅट डनची छोटी मुलगी फ्लोरेन्स आता या जगात राहिली नाही. दोन वर्षांची फ्लॉरेन्स एपिलेप्सीने त्रस्त होती. फ्लॉरेन्सच्या वडिलांनी इंस्टाग्रामवर त्यांच्या मुलीचा फोटो शेअर करून या दुःखद बातमीची माहिती दिली.

इंस्टाग्रामवर एका वेगळ्या विधानात फ्लोरेन्सच्या वडिलांनी लिहिले, आमच्या मुलीला सुंदर पंख मिळाले आणि ती SUDEP हरली आहे. यावेळी शब्द शोधणे जवळजवळ अशक्य आहे. तुम्ही आमच्यावर अतुलनीय प्रेम केले आणि तुम्ही अनेकांच्या जीवनावर केलेला प्रभाव पाहण्यासारखा आहे.

सरेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मॅट डनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फ्लॉरेन्सचा फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, 'तू नेहमी माझ्या हृदयात राहशील. सरेचे क्रिकेट संचालक अॅलेक स्टीवर्ट यांनी एका निवेदनात म्हटले की, 'फ्लोरेन्सच्या निधनाबद्दल ऐकून आम्हा सर्वांना मनापासून दु:ख झाले आहे. आम्‍ही मॅट डन आणि जेसिका यांना सर्वतोपरी मदत देऊ.

मॅट डन अद्याप इंग्लंडमध्ये पदार्पण करू शकला नाही परंतु त्याने इंग्लिश अंडर-19 आणि इंग्लंड लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. वेगवान गोलंदाज मॅट डनने 2010 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून 43 सामन्यांत 36.21 च्या सरासरीने 117 बळी घेतले आहेत. मॅट डनने गेल्या 11 वर्षांत 18 लिस्ट-ए आणि 23 टी-20 सामन्यांमध्ये सरेचे प्रतिनिधित्व केले आहे.