
'माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संघ व्यवस्थापन आणि हार्दिकचा आभारी आहे.'
इंग्लंडच्या फलंदाजाचा IPL मध्ये न खेळण्याचा निर्णय
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) पूर्वीच गुजरात टायटन्सला (Gujarat Titans Team) मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयनं (England Batsman Jason Roy) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) न खेळण्याचा निर्णय घेतलाय. गुजरात टायटन्ससाठी हा पहिलाच मोसम असल्यानं त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. जेसन रॉयनं एक लांबलचक पोस्ट लिहिलीय. त्यात त्यानं आयपीएलमध्ये भाग न घेण्याचं कारण सांगितलंय.
जेसन रॉयनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, मी जड अंतःकरणानं यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल लिलावात माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी संघ व्यवस्थापन आणि हार्दिकचा (Hardik Pandya) आभारी आहे. गेल्या तीन वर्षांपासून जगात जे काही घडतंय, त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडलाय. माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे, त्यामुळं मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायला हवा, असं वाटतं. येत्या दोन महिन्यांत माझं वेळापत्रक आणखीनच व्यस्त होणार आहे. मी गुजरातचे सर्व सामने पाहीन आणि त्यांना पाठिंबा देईन, जेणेकरून त्यांना पहिल्या सत्रातच ट्रॉफी जिंकता येईल, असंही त्यानं सांगितलं. जेसन रॉयला गुजरात टायटन्सनं 2 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं, ही त्याची मूळ किंमत देखील होती.
गुजरात टायटन्स संघ
हार्दिक पांड्या (15 कोटी), रशीद खान (15 कोटी), शुभमन गिल (8 कोटी)
फलंदाज/विकेटकीपर - जेसन रॉय (2 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), डेव्हिड मिलर (3 कोटी), वृद्धिमान साहा (1.9 कोटी), मॅथ्यू वेड (2.40 कोटी)
अष्टपैलू खेळाडू - राहुल तेवतिया (9 कोटी), डॉमिनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), गुरकीरत सिंह मान (50 लाख), साई सुदर्शन (50 लाख) 20 लाख))
गोलंदाज - मोहम्मद शमी (6.25 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), नूर अहमद (30 लाख), आर साई किशोर (3 कोटी), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख) ), वरुण आरोन (50 लाख)