"कर्णधार रूटला पटकन बाद करायचं असेल तर 'हा' आहे मास्टरप्लॅन"

Joe-Root-Out
Joe-Root-Out

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने विराट अन् भारताला दिला सल्ला

Ind vs Eng: पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना १५१ धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली. पण दुसऱ्या डावात त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. तसेच, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर तो विराटकडे झेल देऊन बाद झाला. आता उर्वरित तीन सामन्यांमध्ये जो रूटसाठी कोणता भारतीय वेगवान गोलंदाज डोकेदुखी ठरू शकेल? याचं उत्तर इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसार याने दिलं.

Joe-Root-Out
T20 World Cup: फायनलमध्ये भारताविरूद्ध असावा 'हा' संघ- कार्तिक

जो रूट हा सध्या कसोटी मालिकेतील सर्वाधिक धावा केलेला फलंदाज आहे. दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ३८६ धावा आहेत. रूटला धावा करण्यापासून रोखायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे त्याबद्दल पानेसारने एका मुलाखतीत सांगितलं. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला रूट फलंदाजीसाठी आल्यावर गोलंदाजी दिल्यास त्याचा भारताला फायदा होईल असं त्याने सांगितले.

Joe-Root-Out
इंग्लंडच्या स्टार खेळाडूला दुखापत; भारतासाठी ठरला होता डोकेदुखी

"जो रूटला जर लवकर बाद करायचं असेल तर त्याला पाचव्या स्टंपवर गोलंदाजी करायला हवी. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केल्यास रूट चुका करण्याची शक्यता जास्त आहे. विराटने दुसऱ्या डावात रूटला नीटपणे सापळ्यात अडकवला आणि बुमराहने प्लॅनची नीट अमलबजावणी केली. यापुढेही जेव्हा रूट खेळायला येईल तेव्हा विराटने प्लॅन करावा. रूटला पूल शॉट छान खेळता येतो त्यामुळे त्याला बाऊन्सर टाकण्यात काहीच अर्थ नाही. तो खेळायला आला की थेट बुमराहला गोलंदाजीसाठी आणावं आणि पाचव्या स्टंपवर गोलंदाजी करत राहावी", असा एक प्लॅन इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितला.

Joe-Root-Out
"भारताला UAEतील T20 वर्ल्डकपचा पाकिस्तानपेक्षाही अधिक फायदा"

लॉर्ड्सवरील विजयाचा विक्रम

इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केले. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लॉर्ड्सच्या मैदानावर कर्णधार विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नाही, पण एक खास रेकॉर्ड त्याच्या नावे झालं. भारताला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव आणि टीम इंडियाला ICC च्या सर्व ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनंतर लॉर्ड्सच्या मैदानात कसोटी सामना जिंकणारा कोहली भारतीय संघाचा तिसरा कर्णधार ठरला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय संघाने १९८६ साली या मैदानात भारतीय संघाने विजय नोंदवला होता. नंतर २०१४ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने लॉर्ड्सचे मैदान मारले होते. त्यानंतर किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दिमाखदार विजय नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com