VIDEO : पाकचा बॉलिंग कोच शॉन टेट म्हणतो, सपाटून मार खाल्ला की मला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Bowling Coach Shaun Tait Press Conference Reaction

VIDEO : पाकचा बॉलिंग कोच शॉन टेट म्हणतो, सपाटून मार खाल्ला की मला...

Pakistan Vs England 6th T20 : इंग्लंडने शुक्रवारी पाकिस्तानचा गद्दाफी स्टेडियमवर 8 विकेट्स राखून पराभव केला. इंग्लंडने मालिका आता 3 - 3 अशी बरोबरीत आणली असून सात टी 20 सामन्यांच्या मालिकेचा निकाल आता सातव्या सामन्यावर ठरणार आहे. दरम्यान, सामना झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाकिस्तानचा बॉलिंग कोच शॉन टेटने केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाची पळता भुई थोडी झाली. (Shaun Tait Press Conference Reaction)

हेही वाचा: Women's Asia Cup T20 : रॉड्रिग्ज ठरली स्टार, भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात

सहाव्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दारून पराभव केल्यानंतर पाकिस्तानकडून बॉलिंग कोच शॉन टेट पत्रकारांना सामोरा गेला. ज्यावेळी मीडिया मॉडरेटर पत्रकार परिषद सुरू करत होता त्याचवेळी शॉट टेट आपल्या समोरील माईकमध्ये 'ज्यावेळी आम्ही सपाटून मार खोतो त्यावेळी ते मला पाठवतात.' असं म्हणाला.

दरम्यान, शॉन टेटचे हे वक्तव्य ऐकून पीसीबीचा मीडिया मॉडरेटर चांगलाच हादरला. तो आपला माईक सोडून शॉन टेटच्या जवळ आला आणि त्याने माईक बंद करत टेटला तू बरा आहेस ना असं विचारलं. मॉडरेटरला माहिती होतं की टेटच्या वक्तव्यामुळे वेगळा वाद निर्माण होऊ शकतो. जरी मॉडरेटरने परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Ben Stokes-Harsha Bhogle: मंकडिंग वरून दोन दिग्गज भिडले, ट्विटरवर भारत-इंग्लंड 'WAR'

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 169 धावा केल्या होत्या. त्या पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझमच्या 87 धावांचा मोठा वाटा होता. मात्र पाकिस्तानचे हे 169 धावांचे आव्हान इंग्लंडने 14.3 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने 41 चेंडूत 88 धावा कुटल्या.

पराभवाबद्दल पत्रकार परिषदेत शॉन टेट म्हणाला की, 'त्यांनी आमच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते प्रत्येक चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या तीन षटकात त्यांची ही रणनीती यशस्वी ठरली. यामुळे आमच्या गोलंदाजांची लय बिघडली. आम्ही फार काही चुकीचं केलं नाही. त्यांनी उत्तम फलंदाजी केली. कधी कधी तुम्हाला फलंदाजी करणाऱ्या संघाला श्रेय द्यावं लागतं.'