Eoin Morgan: विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मोर्गनने क्रिकेटला केला अलविदा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eoin Morgan

Eoin Morgan: विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मोर्गनने क्रिकेटला केला अलविदा!

Eoin Morgan : इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

मॉर्गनने गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 16 शतके आणि 64 अर्धशतकांसह 10,858 धावा केल्या. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो एकदिवसीय (6,957) आणि T20 आंतरराष्ट्रीय (2,458) मध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

मॉर्गनने जानेवारीमध्ये SA20 लीगमध्ये पार्ल रॉयल्सकडून शेवटचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळले होते. आता तो ब्रॉडकास्टर म्हणून क्रिकेटमधील कारकीर्द सुरू ठेवणार आहे. मॉर्गनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केले की, “बर्‍याच विचारमंथनानंतर, मला विश्वास आहे की या खेळापासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे ज्याने मला अनेक वर्षांमध्ये खूप काही दिले आहे.

मॉर्गनने 2019 मध्ये विक्रमी 126 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 72 ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय इंग्लंडचे नेतृत्व केले. दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून त्याने मिळविलेले 118 विजय हाही एक विक्रम आहे. तो इंग्लंडसाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा (6,957), इंग्लंडसाठी सर्वाधिक T20 धावा (2,458) आणि दोन्ही स्वरूपांमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे.

मॉर्गनने 2006 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी आयर्लंडकडून 2009 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्याने 248 एकदिवसीय सामने आणि 115 टी-20 सामने खेळले असून त्याने एकूण 10,159 धावा केल्या आहेत. त्याने 16 कसोटी सामनेही खेळले असून 700 धावा केल्या आहेत. मॉर्गन हा दोन वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य होता.