
Sarah Taylor : इंग्लंडच्या सारा टेलरची मोठी घोषणा; गर्भवती पार्टनर डायनासोबत फोटो केला शेअर
Sarah Taylor Announce Partner Pregnancy : इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि विकेटकिपर फलंदाज सारा टेलरने मोठी घोषणा केली आहे. तिची पार्टनर डायना ही गर्भवती झाली आहे. याबाबतची माहिती साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली. सारा टेलरने आपल्या पोस्टमध्ये पार्टरन डायनासाठी हा प्रवास सोपा नसल्याचे सांगितले.
सारा टेलर म्हणाली, 'माझ्या पार्टनरचे आई होणे हे स्वप्न होते. हा प्रवास सोपा नव्हता मात्र डायनाने हार मानली नाही. ती एक चांगली आई होईल असा मला विश्वास आहे. या सर्वाचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. अजून फक्त 19 आठवडे त्यानंतर आयुष्य वेगळेच असेल. मला डायनाचा खूप अभिमान आहे.'
सारा टेलरने 2019 मध्ये मानसिक आरोग्याचे कारण देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तिने 126 वनडे सामने खेळले असून त्यात 7 शतके ठोकली तर 20 अर्धशतकी खेळी केल्या. तर 90 टी 20 सामन्यात तिने 2177 धावा केल्या. याचबरोबर तिने इंग्लंडकडून 10 कसोटी सामन्यात देखील प्रतिनिधित्व केले. यात तिने 330 धावा केल्या. इंग्लंडने 2017 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. 33 वर्षाची सारा टेलर ही या संघाची सदस्य होती.
सारा टेलरने निवृत्तीनंतर 2021 मध्ये एक ऐतिहासिक गोष्ट केली होती. ती पुरूष व्यावसायिक फ्रेंचायजी क्रिकेट संघाची पहिली महिला कोच ठरली होती. सारा टी20 लीगमधील अबू धाबी टीमची सहाय्यर प्रशिक्षक झाली होती.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!