Euro 2024 : इंग्लंडची पेनल्टींवर बाजी! स्वित्झर्लंडविरुद्ध विजयात गोलरक्षक पिकफोर्ड अभेद्य

सामन्याच्या निर्धारित वेळेतील दहा मिनिटे बाकी असताना बुकायो साका याने बरोबरी साधून दिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड अभेद्य ठरला.
Euro 2024 England vs Switzerland
Euro 2024 England vs Switzerlandsakal

Euro 2024 England vs Switzerland : सामन्याच्या निर्धारित वेळेतील दहा मिनिटे बाकी असताना बुकायो साका याने बरोबरी साधून दिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड अभेद्य ठरला. त्यामुळे निर्धारित व अतिरिक्त वेळ मिळून १२० मिनिटांतील १-१ गोल बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडला ५-३ फरकाने नमवून इंग्लंडने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

निर्णायक पेनल्टी शूटआऊटमध्ये पिकफोर्ड इंग्लंडच्या विजयी कामगिरीचा शिल्पकार ठरला. स्वित्झर्लंडतर्फे मॅन्यूएल अकांजी याचा फटका पिकफोर्डने अडविला, त्यानंतर इंग्लंडचे मनोबल उंचावले. ट्रेंट ॲलेक्झँडर-अर्नोल्ड याने अखेरचा फटका अचूक मारत इंग्लंडच्या उपांत्य फेरीत जागेवर शिक्कामोर्तब केले. गतउपविजेत्या इंग्लंडतर्फे कोल पामर, ज्युड बेलिंगहॅम, बुकायो साका, इव्हान टोनी यांनीही अचूक नेमबाजी साधली. अकांजीचा फटका फोल ठरल्यानंतर फाबियान शार, झर्दान साचिरी, झेकी अमदूनी यांच्या फटक्यांचा नेम योग्य ठरला; पण हे प्रयत्न संघाला उपांत्य फेरीत नेण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत.

त्यापूर्वी, ७५व्या मिनिटास ब्रील एम्बोलो याने स्वित्झर्लंडला आघाडी मिळवून दिली होती; पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. गोलक्षेत्राच्या बाहेरून २२ वर्षीय बुकायो साका याच्या डाव्या पायाच्या फटक्यावरील नेम झंझावाती व अचूक ठरला आणि इंग्लंडने ८०व्या मिनिटास बरोबरी साधली.

दृष्टिक्षेपात...

- मुख्य प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा शंभरावा सामना, ते २०१६ पासून संघाचे मार्गदर्शक
- अकराव्यांदा युरो करंडकात खेळणाऱ्या इंग्लंडची चौथ्यांदा उपांत्य फेरी
- २२ वर्षे ३०५ दिवसांचा बुकायो साका युरो करंडकाच्या उपांत्यपूर्व लढतीत गोल करणारा इंग्लंडतर्फे सर्वांत युवा
- स्वित्झर्लंडविरुद्ध मे १९८१ पासून इंग्लंड संघ १४ सामने अपराजित (१० विजय, ४ बरोबरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com