INDW vs ENGW : श्रेयांका, सैकाचं पदार्पण यशस्वी तरी इंग्लंडने चोपल्या 197 धावा

INDW vs ENGW 1st T20I
INDW vs ENGW 1st T20IESAKAL

INDW vs ENGW 1st T20I : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 197 धावा चोपल्या. इंग्लंडकडून डॅनले वॅट (75) आणि नॅट सिवर ब्रंट (77) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची दमदार भागीदारी रचली. भारताकडून रेणुका सिंह ठाकूरने 3 तर श्रेयांका पाटीलने 2 विकेट्स घेतल्या. पदार्पण करणाऱ्या सैका इशाकने देखील 1 विकेट घेतली.

INDW vs ENGW 1st T20I
Harsha Bhogle : कायम छोटेच रहा... हर्षा भोगले यांनी पाकिस्तानच्या खोडसाळ फॅनला दिलं 'कडक' उत्तर

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर पिहल्याच षटकात रेणुका सिंह ठाकूरने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर डँक्ले आणि कॅप्सीची विकेट घेतली. इंग्लंडची अवस्था पहिल्या सहा चेंडूतच 2 बाद 2 धावा अशी झाली होती.

मात्र त्यानंतर वॅट आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी भारताच्या गोलंदाजांवर काऊंटर अटॅक करत त्यांना बॅकफूटवर ढकलले. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची दमदार भागीदारी रचत 11 व्या षटकातच संघाचे शतक धावफलकावर लावले. डॅनले वॅटने 75 तर ब्रंटने 77 धावा ठोकल्या.

INDW vs ENGW 1st T20I
INDW vs ENGW : RCB ची श्रेयांका अन् MI च्या सैका इशाकचं आंतरराष्ट्रीय पदार्पण; स्मृती, हरमनच्या हातून मिळाली कॅप

अखेर पदार्पण करणाऱ्या सैका इशाकने वॅटला 75 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर श्रेयांकाने कर्णधार हेथर नाईटला स्वस्तात बाद करत चौथा धक्का दिला. मात्र दुसऱ्या बाजूने ब्रंटने एमी जॉन्स सोबत तडाखेबाज फलंदाजी करत संघाला 170 धावांच्या पार पोहतवले. अखेर रेणुका ठाकूरने 77 धावा करणाऱ्या ब्रंटला बाद केले.

मात्र जोन्सने 9 चेंडूत 23 धावा चोपत इंग्लंडला 197 धावांपर्यंत पोहचवले अखेर श्रेयांकाने जोन्सला 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com