आदिल राशिद हज यात्रेला जाणार; भारताविरूद्धच्या मालिकेला मुकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England Spinner Adil Rashid Will Go To hajj Maybe Not Playing Against India In Limited Overs Series

आदिल राशिद हज यात्रेला जाणार; भारताविरूद्धच्या मालिकेला मुकणार

नवी दिल्ली : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिदला हज यात्रेला जाण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आदिल राशिद पुढच्या महिन्यात मायदेशात भारताविरूद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकणार आहे. राशिद शनिवारी सौदी अरेबियाला रवाना होणार आहे. त्यामुळे तो यॉर्कशर तर्फे टी 20 ब्लास्टच्या शेवटच्या टप्प्यातील सामने देखील खेळणार नाही. (England Spinner Adil Rashid Will Go To hajj Maybe Not Playing Against India In Limited Overs Series)

हेही वाचा: Ranji Trophy : यश - शुभमची शतकी खेळी; मध्य प्रदेशचे मुंबईला चोख प्रत्युत्तर

राशिद इएसपीएल क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, 'मी गेल्या काही काळापासून हज यात्रेला जाण्यासाठी इच्छुक होतो. मात्र योग्य वेळ साधता येत नव्हती. या वर्षी मला ही यात्रा करण्याचा निश्चय केला. मी याबाबत इसीबी आणि यॉर्कशर यांच्याशी बोललो. त्यांनी मला समजून घेतले. तुला ही यात्रा केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. मी काही आठवडे तेथे राहणार आहे.'

राशिद पुढे म्हणाला की, 'माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे. प्रत्येक धर्माच्या काही गोष्टी असतात. इस्लाम आणि एक मुसलमान असण्याच्या नात्याने माझ्यासाठी हज यात्रा सर्वात महत्वाची आहे.'राशिद खान इंग्लंडने नुकताच केलेल्या नेदरलँड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर इंग्लंडने तीन वनडे सामन्यांची एक मालिका खेळली. ही मालिका इंग्लंडने 3 - 0 ने जिंकली.

हेही वाचा: उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी भारतीय महिला रग्बी खेळाडूवर बंदी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका 7 ते 17 जुलैपर्यंत खेळली जाणार आहे. यात तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांचा समावेश आहे. राशिद या सर्व सामन्यासाठी उपलब्ध नसण्याची दाट शक्यता आहे. तो इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेसाठी तो संघात पुन्हा येऊ शकेल.

Web Title: England Spinner Adil Rashid Will Go To Hajj Maybe Not Playing Against India In Limited Overs Series

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top