IND vs ENG
IND vs ENGTwitter

IND vs ENG: बाबो... असा टॉस उडवलेला कधी पाहिलाय का (Video)

टॉसवेळी यजमान इंग्लंड संघाचा कर्णधार ज्यो रुटचा एक अनोखा तोरा पाहायला मिळाला.
Published on

England vs India 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूनं झुकला. टॉसवेळी यजमान इंग्लंड संघाचा कर्णधार ज्यो रुटचा एक अनोखा तोरा पाहायला मिळाला. विराट आणि रुट हे दोघे टॉसला मैदानात उतरले. नाणेफेकीच्या वेळी ज्यो रुटनं चेंडू थ्रो करावा अशा अविर्भावात नाणं आकाशाच्या दिशनं भिरकावल्याचे पाहायला मिळाले.

मालिकेतील पिछाडीवर असल्याचा रागच तो टॉस करताना व्यक्त करतोय की काय? असाच तो क्षण होता. दुसरीकडे बऱ्याचदा टॉस जिंकण्यात अपयशी ठरणारा विराट कोहली कौल आपल्या बाजूनं लागल्याने आश्चर्यचकित झाल्यासारखा दिसला. त्यानंतर त्याने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG
IND vs ENG: म्हणून अश्विनला संघात घेतलं नाही- विराट कोहली

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याच्या विराट कोहलीचा निर्णय सुरुवातीला तर फोल ठरल्याचे दिसते. अँडरसनने विराट कोहलीसह आघाडीच्या तीन खेळाडूंना स्वस्तात माघारी धाडले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळीसह भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचललणाऱ्या लोकेश राहुलला अँडरसन खातेही उघडू दिले नाही. चेतेश्वर पुजारा अवघी एक धाव करुन माघारी फिरला. विराटलाही दुहेरी आकडा पार करता आला नाही.

IND vs ENG
विराटची पाकिस्तानी क्रिकेटरकडून पाठराखण; केलं महत्त्वाचं विधान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेलिंग्डेच्या लीड्स मैदानात खेळवण्यात येत आहे. लॉर्ड्सच्या मैदानातील विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरला असून अँडरसनने संघाला दमदार सुरुवात करुन दिलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com