ENG vs IND Day 4 : दिवसअखेर रूट - बेअरस्टोची दीडशतकी भागीदारी

England vs India 5th Test Day 4 Live Cricket Score Highlights Joe Root
England vs India 5th Test Day 4 Live Cricket Score Highlights Joe Rootesakal

बर्मिंगहम : ENG vs IND Live Day 4 | भारताने इंग्लंडसमोर पाचवी कसोटी जिंकण्यासाठी 378 धावांंचे आव्हान ठेवले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. अॅलेक्स लिज आणि झॅक क्राऊलीने नाबाद शतकी सलामी दिली. लिजने दमदार अर्धशतक ठोकले.

मात्र झॅक क्राऊलीला अर्धशतकासाठी फक्त चार धावांची गरज असतानना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवून देत शतकी सलामी देणारी ही जोडी फोडली. मात्र त्यानंतर त्यांची घरसगुंडी उडाली. बुमराहने झॅक क्राऊली आणि ऑली पोपला बाद केल्यानंतर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाने मिळून अर्धशतक ठोकणाऱ्या अॅलेक्स लिजला 56 धावांवर धावबाद केले.

इंग्लंडचा हा गडगडलेला डाव अनुभवी जो रूट आणि पहिल्या डावात दमदार शतक करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी आक्रमक शतकी भागीदारी रचली. रूटने नाबाद अर्धशतक ठोकले.

जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी ही भागीदारी 150 पार नेत इंग्लंडला दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर 259 धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडला आता विजयासाठी फक्त 119 धावांची गरज आहे. त्यासाठी त्यांच्याकडे उद्याचा संपूर्ण दिवस शिल्लक आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी जो रूट 112 चेंडूत 76 धावा करून तर जॉनी बेअरस्टो 87 चेंडूत 72 धावा करून नाबाद होता.

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत आपला दुसरा डाव 3 बाद 125 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. चौथ्या दिवशी भारताने पहिल्या सत्रात आक्रमक फलंदाजी करत आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला.

मात्र या प्रयत्नात चेतेश्वर पुजारा 66 धावांवर ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक धावा करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतने देखील आपला दांडपट्टा सुरू केला होता. या दोघांनी भारताची आघाडी 300 पार नेली. दरम्यान, पंतने 86 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.

मात्र भारताच्या 190 धावा झाल्या असताना श्रेयस अय्यर 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर पंतही माघारी गेला. पंत बाद झाला त्यावेळी भारताच्या 198 धावा झाल्या होत्या. शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांनी भारताला 200 च्या पार पोहचवले. मात्र शार्दुल ठाकूरला फक्त 4 धावांचे योगदान देता आले. यानंतर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने भारताला उपराहापर्यंत 7 बाद 229 धावांपर्यंत पोहचवले.

उपहारानंतर बेन स्टोक्सने भेदक मारा करत भारताचा डाव 245 धावात संपुष्टात आणला. त्याने जडेजाला 23 धावांवर बाद केले.

दिवसअखेर इंग्लंड 3 बाद 259 धावा, विजयासाठी 119 धावांची गरज

जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 150 धावांची भागीदारी रचत इंग्लंडला दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर 259 धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडला आता विजयासाठी फक्त 119 धावांची गरज आहे. त्यासाठी त्यांच्याकडे उद्याचा संपूर्ण दिवस शिल्लक आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी जो रूट 112 चेंडूत 76 धावा करून तर जॉनी बेअरस्टो 87 चेंडूत 72 धावा करून नाबाद होता.

रूट पाठोपाठ बेअरस्टोचे देखील अर्धशतक

जो रूट पाठोपाठ त्याचा पार्टनर जॉनी बेअरस्टोने देखील दमदार अर्धशतक ठोकत इंग्लंडला 250 च्या जवळ पोहचवले.

जो रूटचे झुंजार अर्धशतक

बिनबाद 107 धावांवरून 3 बाद 109 धावा अशी अवस्था झालेल्या इंग्लंडचा डाव जो रूटने सावरला. त्याने अर्धशतक ठोकत जॉनी बेअरस्टो सोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद 88 धावांची भागीदारी रचली.

109-3 : इंग्लंडची दमदार सुरूवातीनंतर घसरगुंडी

भारताच्या 378 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने शतकी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांची घरसगुंडी उडाली. बुमराहने झॅक क्राऊली आणि ऑली पोपला बाद केल्यानंतर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाने मिळून अर्धशतक ठोकणाऱ्या अॅलेक्स लिजला 56 धावांवर धावबाद केले.

107-2 : इंग्लंडला दुसरा धक्का

कर्णधार जसप्रीत बुमराहने इंग्लंडला दुसरा धक्का दिला. त्याने ऑली पोपला भोपळाही न फोडू देता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

107-1 : अखेर बुमराहने जोडी फोडली

इंग्लंडला दमदार सुरूवात करून देणारी सलामी जोडी अखेर कर्णधार जसप्रीत बुमराहने फोडली. त्याने 76 चेंडूत 46 धावा करणाऱ्या झॅक क्राऊलीला बाद केले.

लिजचे दमदार अर्धशतक तर क्राऊली देखील वाटेवर

इंग्लंडचे सलामीवीर अॅलेक्स लिज आणि झॅक क्राऊली यांनी दमदार फलंदाजी करत इंग्लंडचे शतक 20 व्या षटकातच धावफलकावर लावले. लिजने दमदार अर्धशतक पूर्ण केले.

58-0 : इंग्लंडची आक्रमक सुरूवात

भारताचे 378 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात आक्रमक सुरूवात केली. सलामीवीर झॅक क्राऊली आणि अॅलेक्स लिजने संघाला अर्धशतकी मजल मारली.

भारताचा डाव 245 धावांवर संपुष्टात, इंग्लंडसमोर 378 धावांचे आव्हान

बेन स्टोक्सने भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहला 7 धावांवर बाद करत भारताचा डाव 245 धावांवर संपुष्टात आणला. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे आव्हान ठेवले आहे.

236-9 : बेन स्टोक्सने जडेजाचा उडवला त्रिफळा

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 23 धावा करणाऱ्या रविंद्र जडेजाला बोल्ड करत भारताला 9 वा धक्का दिला. भारताची आघाडी 368 धावांपर्यंत पोहचली.

230-8 : उपहारानंतर भारताला आठवा धक्का 

इंग्लंडने भारताला उपहारानंतर लगेचच आठवा धक्का दिला. कर्णधार बेन स्टोक्सने त्याला 13 धावांवर बाद केले.

उपराहापर्यंत भारताकडे 361 धावांची आघाडी

भारताने दुसऱ्या डावात चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 7 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली. सध्या रविंद्र जडेजा 17 तर मोहम्मद शमी 13 धावांवर नाबाद आहे.

207-7 : शार्दुल ठाकूर बाद 

मॅटी पॉट्सने शार्दुल ठाकूरला 4 धावांवर बाद करून भारताला सातवा धक्का दिला. मात्र त्यापूर्वी भारत 200 च्या पार पोहचला होता.

198-6 : आक्रमक पुन्हा बाद 

जॅक लिचने भारताचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतला 57 धावांवर बाद करत त्याची आक्रमक अर्धशतकी खेळी संपुष्टात आणली.

190-5 : श्रेयस अय्यर बाद

मॅटी पॉट्सने श्रेयस अय्यरला 19 धावांवर बाद करत भारतला पाचवा धक्का दिला.

ऋषभ पंतचे दमदार अर्धशतक

भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतने दुसऱ्या डावात देखील दमदार अर्धशतक ठोकत भारताला मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भारताची आघाडी 330 धावांवर

भारताची आघाडी 300 पार 

भारताने चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आक्रमक फलंदाजी करत आपली आघाडी 300 च्या पार पोहचवली.

153-4 : स्टुअर्ट ब्रॉडने भारताला दिला चौथा धक्का

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात स्टुअर्ट ब्रॉडने चेतेश्वर पुजाराला बाद करून भारताला चौथा धक्का दिला. पुजाराने 168 चेंडूत 66 धावांची खेळी केली.

पुजारा - पंत मैदानावर 

सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिले सत्र भारतासाठी महत्वाचे असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com