ENG vs IND : इंग्लंडचा विक्रमी चेस, मालिका विजयाची संधी भारताने दवडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England vs India 5th Test Day 5 Rescheduled match Live Cricket Score Highlights

ENG vs IND : इंग्लंडचा विक्रमी चेस, मालिका विजयाची संधी भारताने दवडली

बर्मिंगहम : इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारताचा सात गडी राखून पारभव करत पाच कसोटी सामन्यांची मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. भारताने पाचव्या कसोटीत विजयासाठी ठेवलेल्या 378 धावांचा 3 फलंदाजांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला. इंग्लंडने यापूर्वी चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2019 मध्ये 359 धावांचा पाठलाग केला होता. तो विक्रम आज इंग्लंडने मोडला. इंग्लंडकडून जो रूटने दमदार शतक ठोकले. त्याला साथ देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने देखील सलग दुसऱ्या डावात शतकी खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा मोठा वाटा उचलला.

ENG vs IND Day 5 Highlights

रूटपाठोपाठ बेअरस्टोचे देखील दमदार शतक, इंग्लंडने सामना सात गडी राखून जिंकला

जॉनी बेअरस्टोने पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही शतक ठोकले. त्याने जो रूट सोबत नाबाद 269 धावांची भागीदारी रचली. याचबरोबर या दोघांनी इंग्लंडच्या विजयाची औपचारिकता संपवली.

रूटचे दमदार शतक 

जो रूटने कसोटीतील आपले 28 वे शतक ठोकत भारताविरूद्धच्या पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजयीपथावर घेऊन गेला.

रूट - बेअरस्टो शकताच्या जवळ 

जो रूट आणि बेअरस्टो हे दोघेही नव्वदीत पोहचले असून इंग्लडने 300 धावांचा टप्पा पार केला आहे.

रूट आणि बेअरस्टोची चांगली सुरूवात

सामन्याच्या पाचव्या दिवशी जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार सुरूवात करत विजयासाठीचे आव्हान 100 च्या आत आणले. दोघेही 80 च्या घरात पोहचले आहेत.

भारत पुनरागमन करण्यासाठी जोर लावणार

इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचे फक्त तीन फलंदाज बाद करता आले. तर जो रूट (74) आणि बेअरस्टोने (72) आक्रमक फलंदाजी करत दिवसअखेर 259 धावांपर्यंत मजल मारली. आता त्यांना विजयासाठी फक्त 119 धावांची गरज आहे.

Web Title: England Vs India 5th Test Day 5 Rescheduled Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..