India vs England Full Schedule: क्रिकेट अन् फक्त क्रिकेट! टीम इंडियाचा आता रात्रीस खेळ चाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs England Full Schedule

क्रिकेट अन् फक्त क्रिकेट! टीम इंडियाचा आता रात्रीस खेळ चाले

India vs England Full Schedule: इंग्लंड दौऱ्यावर एकमेव कसोटी सामन्यात चांगली सुरुवात करूनही भारतीय संघ जिंकू शकला नाही. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पराभव पत्करावा लागला. पराभवामुळे भारतीय चाहते अधिक निराश झाले आहे. पण या पराभवाचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेद्वारे रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. रोहित तब्बल 112 दिवसांनी खेळणार आहे. 14 मार्च रोजी त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

हेही वाचा: Wasim Jaffer | ट्रोल करणाऱ्या इंग्लंडच्या वॉनला जाफरने 'दाखवला आरसा'

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत 6 सामने होणार आहेत. सामने 7 जुलै ते 17 जुलै दरम्यान खेळवले जातील. म्हणजेच पुढील 11 दिवसांत दोन्ही संघांमध्ये 6 सामने होतील. पहिला टी-20 सामना साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाईल. हा दिवस-रात्र सामना जाईल जो भारताच्या वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. म्हणजेच या सामन्याचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटप्रेमींची झोप मोड करावी लागेल.

हेही वाचा: परदेशात भारतीय गोलंदाज पुन्हा अपयशी, काय आहे पराभवाचे कटू सत्य?

मालिकेतील दुसरा टी-20 सामना 9 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे संध्याकाळी 7 वाजता खेळला जाईल. तिसरा टी-20 सामना 10 जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. हा सामना देखील संध्याकाळी ७ वाजल्यापासून भारतीय वेळेनुसार होणार आहे. दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी दोन हात करतील. एकदिवसीय मालिकेतील सामने 12, 14 आणि 17 जुलै रोजी होणार आहेत. पहिले दोन एकदिवसीय सामने दिवस-रात्र असतील भारतीय वेळेनुसार 5.30 वाजता सुरू होतील. तिसरा T20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल.

Web Title: England Vs India Full Schedule T20i Series Begins July 7 Rohit Sharma Will Return Eng Vs Ind Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top