IND vs ENG : जो टीम इंडियाला नडला तो रडला!

इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरीजशी त्या वेब सिरीजचं काय कनेक्शन?
Indian Cricket Team
Indian Cricket TeamTwitter
Updated on

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन कसोटीत कांगारुंच्या उंदीर चाळ्यामुळं 'जेंटलमॅन गेम'​ बदनाम झाला. बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूंनी याची किंमतही मोजली. ऑस्ट्रेलियाच्या पांढऱ्या जर्सीवर पडलेला काळा डाग पुसून काढण्यासाठी 2020 मध्ये एक वेब सिरिज प्रसिद्ध झाली. Amazon Prime Video च्या The Test A New Era For Australia's Team या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक लँगर आपल्या सहकाऱ्यांना टीम इंडियाविरुद्ध काय करायचे आणि काय करायचे नाही; याचे धडे देताना दाखवण्यात आले होते. टीम इंडियाला रोखायचे असेल तर विराट कोहलीला डिवचू नका. हा त्यातला एक मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की, विराट कोहली तुमच्या अंगावर आला तरी शांत रहा. जस्टीस लँगरने विराट अँण्ड कंपनी विरोधात स्लेजिंग करणाऱ्याला शिक्षा केल्याचेही या सिरीजमध्ये दाखवण्यात होते. स्मिथनंतर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणाऱ्या टीम पेनने विराट कोहलीला खुन्नस दाखवल्यानंतर त्याला ड्रेसिंग रुममधला कचरा उचलण्याची शिक्षा वैगेरे... गोष्टी या सीरीजमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या सर्व गोष्टींना उजाळा देण्याचं कारण काय? इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरीजशी या वेब सिरीजचं काय कनेक्शन?

इंग्लंड आणि भारत यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये स्लेजिंगचा खेळ पाहायला मिळाला. अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला कोहलीनं तुझ्या घरच्या बॅकयार्डमध्ये गोलंदाजी करत नाहीस या भाषेत सुनावलं. या सामन्यात इंग्लंडच्या संघात नसणाऱ्या पण अँडरसनचा सहकारी असलेल्या स्टुअर्ड ब्रॉडने ट्विटरच्या माध्यमातून विराटला धमकी दिली. ही बाचाबाची महागात पडेल..वैगेर असं ट्विट ब्रॉडनं केलं. पण त्याने किंवा इंग्लंडने The Test A New Era For Australia's Team ही वेव सीरिज पाहिली असती तर कदाचित मैदानात वातावरण तापलं नसतं. आणि कदाचित इंग्लंडला पराभवाचा चटकाही बसला नसता.

Indian Cricket Team
IND vs ENG: VVS लक्ष्मणसोबतच्या 'या' मॅचविनर खेळाडूला ओळखलंत?

खूप मागे जाण्याची गरज नाही गोष्ट आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा डाव अवघ्या 36 डावात आटोपला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर विराट कोहली मायदेशी परतला. वैयक्तिक कारणास्तव कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत एकमेव टेस्ट खेळणार हे आधीच स्पष्ट होते. त्यावेळी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऐतिहासिक कामगिरी करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. स्टार प्लेयर्सची दुखापतीमुळे माघार घेतली असताना युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील मिशन फत्ते केले होते. प्रत्येक संघातील खेळाडू हा सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतो. अनेकदा काही गोष्टी अशा असतात की खेळाडू अधिक जोर लावून जिद्दीने खेळतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह इंग्लंड दौऱ्यावर हीच गोष्ट भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची ठरली.

Indian Cricket Team
Video: विराट पुढे निघाला पण मागून रोहितने हाक मारली अन्...

ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. गाबाच्या मैदानात खेळायला टीम इंडिया भित आहे, असे बोलले गेले. प्रेक्षकांमधूनन भारतीय खेळाडूंबद्दल अपशब्द वापरले गेले. हिच गोष्ट क्रिकेटच्या पंढरीतही घडली. लोकेश राहुलच्या दिशेने शॅम्पेन कॉर्क वैगेरे फेकण्याचा प्रकार झाला. इंग्लंडचे खेळाडू भारतीय खेळाडूंना मैदानात डिवचताना दिसले आणि टीम इंडियातील खेळाडूंचे रक्त उसळले. किंग कोहली किंवा त्याच्या ब्रिगेडचा मागील काही सामन्यातील ऐतिहासिक विजयात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये. मायदेशात दादागिरी करणारी टीम इंडिया आता विदेशातही दादागिरी करणारी झालीये हा एक वेगळा विषय होईल. पण टीम इंडियातील खेळाडूंसोबत जो नडलाय त्या टीमला टीम इंडियाने रडवलंय. त्यात खेळाडू आणि प्रेक्षकांकडून झालेल्या शाब्दिक माऱ्याचा इफेक्ट जरा जास्तच दिसून आलाय. या गोष्टीचा दावा नाही हे एक टीम इंडियाच्या कामगिरीतून केलेले निरीक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com