esakal | ENG vs IND : पाकचा फ्लॉपशो, सामन्यासह मालिकाही गमावली!
sakal

बोलून बातमी शोधा

England vs Pakistan

ENG vs IND : पाकचा फ्लॉपशो, सामन्यासह मालिकाही गमावली!

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs Pakistan 2nd ODI : क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील विजयासह बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशी खिशात घातली. इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दोनशेचा टप्पाही पार करु शकला नाही. सौद शकीलच्या 56 धावांच्या खेळीशिवाय एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी पाकिस्तानचा डाव 41 व्या षटकात 195 धावांतच आटोपला. (England vs Pakistan 2nd ODI England won by 52 run Saud Shakeel Half Centurty Pakistan Loss Match And Series)

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे सामना 47-47 षटकांचा खेळवण्यात आला. हसन अलीच्या पंजाच्या (5 विकेट) जोरावर इंग्लंडला तेवढ्याही ओव्हर्स खेळता आल्या नाही. सलामीवीर फिलीप सॉल्ट 60 (54), जेम्स विन्स 56 (52) या दोघांच्या अर्धशतकानंतर तळाच्या फलंदाजीत लुईस ग्रेगरी 40 (47) आणि ब्रायडन कारसे यांनी 31 (41) धावा करत संघाची धावसंख्या 45.2 षटकात 247 धावांपर्यंत पोहचवली.

हेही वाचा: ENG vs PAK : नवख्या गोलंदाजामोर बाबरने पुन्हा टेकले गुडघे! (VIDEO)

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर इमान उल हक 1 (2) याने तंबूचा रस्ता धरला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला बाबर आझम पुन्हा फेल ठरला. 15 चेंडूत 19 धावांवर महमूदने त्याला बाद केले. विकेट किपर बॅट्समन मोहम्मद रिझवान 11 चेंडूत 5 धावा करुन तंबूत परतला.

हेही वाचा: क्रिकेटसाठी घेतला होता टेनिसमधून ब्रेक! पाहा विम्बल्डन सम्राज्ञीचे खास फोटो

सोहिब मकसूद 19 (17), शदाब खान 21 (20), फहिम अश्रफ 1 (9) स्वस्तात बाद झाल्यानंतर हसन अलीने मैदानात तग धरुन संघाच्या आशा पल्लवीत केल्या. त्याने शकीलसोबत 32 धावांची भागीदारी केली. ब्रायडेनने ही जोडी फोडत संघातील विजयाचा मार्ग मोकळा केला. एकाकी झुंज देणाऱ्या शकीलनेही 56 धावा करुन मैदान सोडले. लुईस ग्रेगरीने हॅरिस राउफला तंबूत धाडत संघाच्या विजावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यातील पराभवासह पाकिस्तानने वनडे मालिका गमावली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना 13 जुलैला रंगणार आहे.

loading image