FIFA World Cup22 : इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत, आता फ्रान्सशी लढत

इंग्लंडचा सेनेगलवर सहजसुंदर विजय
 England vs Senegal FIFA World Cup 2022 England Blank Senegal 3-0 Set To Face France in Quarters
England vs Senegal FIFA World Cup 2022 England Blank Senegal 3-0 Set To Face France in Quarters sakal
Updated on

FIFA World Cup England vs Senegal : तुलनेने दुबळ्या असलेल्या सेनेगलचे आव्हान ३ विरुद्ध 0 गोलने मोडून काढत इंग्लंडने आज बाद फेरीतील सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. संपूर्ण - सामन्यात सेनेगलला एकदाही डोके वर काढण्याची संधी इंग्लंडच्या खेळाडूंनी दिली नाही. उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी (ता. १०) इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात लढत होईल.

सामन्याच्या प्रारंभापासूनच इंग्लंडच्या आक्रमणाला धार होती. इंग्लंडच्या या जोरदार आक्रमणापुढे आफ्रिकेतील विजेत्या सेनेगलला फारसा प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला बेलिंगहॅमच्या पासवर जॉर्डन हेंडरसनने मनगलच्या गोलरक्षक एदुआर्द मेंडीला चकविले आणि आघाडी मिळवून दिली. तेथून सुरू झालेला इंग्लंड पाठिराख्यांचा जल्लोष सामन्याच्या अखेरपर्यंत सुरूच राहिला. या गोलनंतर सेनेगलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्वार्धातील अतिरिक्त वेळेत ४६ मिनिटाला हॅरी केनने आणखी एक गोल करून इंग्लंडची आघाडी वाढविली.

उत्तरार्धात इंग्लंडने प्रारंभी काही वेळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले. मात्र, त्याचा फारसा फायदा सेनेगलच्या आक्रमकांना घेता आला नाही. उलट त्यांची बचावफळी विस्कळीत झाली. त्यांच्या या स्थितीचा फायदा घेत कौलुबेलीच्या पासवर बुकायो साका याने ५७ व्या मिनिटाला इंग्लंडकडून आणखी एक गोल केला आणि विजयी आघाडी घेतली. सामना संपल्याची शिटी वाजल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानात आणि मैदानाबाहेर पाठीराख्यांनी जोरदार जल्लोष केला; तर सेनेगलच्या चाहत्यांचे चेहरे रडवेले झालेले होते. या पराभवावरोवरच सेनेगलचे आव्हानही संपुष्टात आले.

आम्ही एका चांगल्या संघाला हरविल्याचे समाधान आहे. आमच्या सर्वच खेळाडूंनी दर्जेदार आणि परिपक्व खेळाचे दर्शन घडविले. देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल टाकले आहे.

- हॅरी केन, इंग्लंडचा खेळाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com