लंकेच काही खरं नाही; इंग्लंडकडून वनडेतही खाल्ला सपाटून मार

इंग्लंडकडून क्रिस वोक्सने 10 षटकांच्या कोट्यातील निम्म्या ओव्हर्स मेडन टाकत अवघ्या 18 धावा खर्च करुन सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
England vs Sri Lanka
England vs Sri Lanka Twitter

England vs Sri Lanka, 1st ODI : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा धुव्वा उडवणाऱ्या इंग्लंडने वनडे मालिकेची सुरुवातही धमाकेदार केली. चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाइड ग्राउंडवर रंगलेल्या पहिल्या वनडेत श्रीलंकेने दिलेले 185 धावांचे लक्ष्य यजमान इंग्लंडने 5 गडी राखून पार केले. कर्णधार कुशल पेरेरा 73 (81) आणि हसरंगा 54 (65) यांच्या व्यतिरिक्त एकाही श्रीलंकन फलंदाजाला मैदनात तग धरता आला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव 42.3 षटकात 185 धावांत आटोपला होता. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने 10 षटकांच्या कोट्यातील निम्म्या ओव्हर्स मेडन टाकत अवघ्या 18 धावा खर्च करुन सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. विलीने तीन तर मोईन अलीला एक विकेट मिळाली. (England vs Sri Lanka 1st ODI England won by 5 wkts)

England vs Sri Lanka
विम्बल्डन सुरु असताना रंगली सचिन-विराट जोडीची चर्चा

श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बेयरस्ट्रो आणि लायम लिविंगस्टोन याने पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. करुणारत्नेनं 9 धावांवर खेळणाऱ्या लायम लिविंगस्टोनला तंबूचा रस्ता दाखवला. जॉनी बेयरस्ट्रोने 21 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावांची महत्त्वाची खेळी केली. जो रुटने नाबाद 79 धावांची खेळी करत संघाला विजय नोंदवून दिला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या संघाने 34.5 षटकात सामना खिशात घातली.

वनडे मालिकेपूर्वी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका झाली. या मालिकेतील तिन्ही सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेची पराभवाची ही मालिका वनडेतही कायम राहिलीये. उर्वरित दोन वनडे सामन्यात श्रीलंकासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दुसरा वनडे सामना त्यांच्यासाठी 'करो वा मरो'ची लढाई असणार आहे. 1 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात श्रीलंका मालिकेत बरोबरी साधणार? की इंग्लंडचा संघ टी-20 प्रमाणे मालिका खिशात घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

England vs Sri Lanka
विम्बल्डन सुरु असताना रंगली सचिन-विराट जोडीची चर्चा

तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला शंभरीच्या आत रोखून 89 धावांनी मोठा विजय नोंदवला होता. वनडेतही त्यांनी श्रीलंकेला दोनशेच्या आत रोखले. श्रीलंका इंग्लंड दौऱ्यावर संघर्ष करताना दिसत असून यातून सावरण्यासाठी त्यांच्यासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com