ENGvsWI 1st Test सामन्याचे अपडेट्स अन् इतर क्रीडा क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर

टीम ई-सकाळ
गुरुवार, 9 जुलै 2020

प्रेक्षकांशिवाय पहिल्यांदाच रंगलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील पहिला दिवस पावसाने गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी विंडीज गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवून दिला.

लंडन : कर्णधार जेसन होल्डरचा भेदक मारा आणि त्याला गॅब्रियनची लाभलेली सुरेख साथ याच्या जोरावर एजेस बाऊलच्या स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी विंडीजच्या पाहुण्या संघाने यजमान इंग्लंडला अवघ्या 204 धावांवर रोखले. दुसऱ्या दिवशीचा डाव संपला तेव्हा विंडीजने जॉन कॅम्पेबलच्या रुपात 1 गडी गमावून 19 षटकात धावफलकावर 57 धावा लावल्या होत्या. जेम्स अँड्रसनने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. क्रेग ब्रॅथवेट आणि जॉन कॅम्पबेल यांनी विंडीजच्या पहिल्या डावाला सुरुवात केली.

सलामी जोडी अर्धशतकाची भागीदारी करत असताना 13 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अँड्रसनला ही जोडी फोडण्यात यश आले.  कॅम्बबेल 36 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 28 धावा करुन माघारी फिरला. दुसऱ्या दिवासाचा खेळ संपला तेव्हा ब्रेथवेट 65 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 20 धावांवर तर  शाय होप 16 चेंडूत 3 धावांवर खेळत होते. वेस्ट इंडिजचा संघला 147 धावांनी पिछाडीवर असून तिसऱ्या दिवशी विंडीजचा संघ आघाडी घेणार की इंग्लिश गोलंदाज त्यांना रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

@सकाळ स्पोर्टस्  क्रीडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. कोरोनानंतर मैदानात उतरणाऱ्या संघातील गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल, अशी चर्चा या सामन्याच्या सुरुवातीला रंगली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला लाळ किंवा थूंकी वापरण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे चेंडूला स्विंग मिळणे कठीण होईल, अशीही चर्चा रंगली. प्रेक्षकांशिवाय पहिल्यांदाच रंगलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील पहिला दिवस पावसाने गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी विंडीज गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवून दिला.

हा क्षण सामन्यापूर्वी जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला

यजमान इंग्लंडच्या आघाडीच्या गड्यांना स्वस्तात माघारी धाडत पाहुण्या विंडीजने दमदार सुरुवात केली आहे. अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स आणि जोस बटलरने संघाची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. पण विंडीज कर्णधार जेसन होल्डरने त्याला 43 धावांवर माघारी धाडत यजमानांना अडचणी आणखी वाढवल्या. त्याच्या पाठोपाठ होल्डरने बटलरलाही तंबूचा रस्ता दाखवला. गॅब्रियल आणि जेसन होल्डरच्या माऱ्यासमोर हतबल ठरल्यामुळे यजमान साहेबांचा संघ बॅकफूटवर गेला. होल्डरने ऐतिहासिक सामन्यात सहा बळी टिपले असून गॅब्रियनने चार जणांना तंबूचा रस्ता दाखवला.   

गॅब्रिएल व होल्डर यांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा निम्मा संघ गारद

आघाडी कोलमडल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदांचा विंडीज गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. जोस बटलरची जागा घेण्यासाठी आलेल्या डॉमिनिक बेसने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. जोफ्रा आर्चरला होल्डरने खातेही खोलू दिले नाही. तो सहा चेंडूचा सामना करुन शून्यावर माघारी फिरला. मार्क वूडलाही होल्डरनेच पाच धावांवर बाद केले. जेम्स अँड्रसनच्या रुपात ग्रॅब्रियलने चौथी विकेट घेत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांतच आटोपला.  

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीतून सावरत सुरु झालेल्या ऐतिहासिक सामन्यातील खास बातमी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England vs West Indies 1st Test Day 2 Jason Holder Rock Ben Stokes England Team struggle to Bat