ENGvsWI 1st Test : सामन्याचे अपडेट्स अन् दिवसभरातील चर्चेतील बातम्या एका क्लिकवर

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 10 जुलै 2020

लंडन : विंडीजचा सलामीवीर क्रॅग ब्रेथवेट आणि शाय होपने तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात करत अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी मैदानात तग धरुन इंग्लंडची डोकेदुखी वाढवणार असे चित्र दिसत असताना  शाय होपच्या रुपात डॉम बेसनं पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. विंडीजच्या धावफलकावर 102 धात असताना होप 36 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 28 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर ब्रेथवेटनं शमर्थ ब्रुक्सच्या साथीनं संघाची धावसंख्या हलती ठेवली. दरम्यान त्याने कसोटी कारकिर्दीतील आपले 18 अर्धशतक पूर्ण केले.

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा  आमची @सकाळ स्पोर्टस् वेबसाईट आणि फेसबुक पेज लाइक आणि शेअर करायलाही विसरु नका  

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या बेन स्टोक्सने त्याच्या संयमी खेळीला ब्रेक लावला. त्याने 125 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने संघासाठी 65 धावांचे योगदान दिले. जेम्स अँड्रसनने जम बसलेल्या ब्रुक्सला 39 धावांवर माघारी धाडले आहे. ब्लॅकवूडच्या रुपात डॉम बेसनं विंडीजला पाचवा धक्का दिला. ब्लॅकवूडन संघासाठी अवघ्या 12 धावांचे योगदान दिले. सध्याच्या परिस्थितीत विंडीजचा संघ फ्रंटफूटवर असून ते मोठी आघाडी घेणार की तळाच्या फलंदाजांना गुंडाळत इंग्लिश संघ सामन्यात पुन्हा येण्याचा पराक्रम करुन दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England vs West Indies 1st Test Day 3 cricket Score Kraigg Brathwaite Half Century And More Updates