England vs Zimbabwe : १८ वर्षांनंतर इंग्लंड-झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना; भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी
Test Match 2025 : १८ वर्षांच्या खंडानंतर इंग्लंड आणि झिम्बाब्वे संघ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार आहेत. इंग्लंड संघासाठी हा सामना भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी म्हणून महत्वाचा ठरणार आहे.
नॉटिंगहॅम : भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र असताना लंडनमध्ये इंग्लंडचा संघ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी सुरू करत आहे. उद्यापासून ते झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळणार आहेत.